पानोडी । झुंजार न्यूज

 

 

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ठाकरवाडी व हजारवाडी यांच्या आदिवाशी समाज्याच्या वस्तीकरिता पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशाने वीज मंहामडळाच्या स्ट्रीट लाईटच्या कामास शुभारंभ झाल्याने लवकर पूर्ण वेळ लाईट या वस्तींना मिळणार

oplus_1024

शिर्डी विधानसभातर्गत पालकमंत्री तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेतील विविध गावांच्या दौराकरित असताना ठाकरवाडी व हजारवाडी येथे आले असता काही महिलांनी केलेल्य ” आम्हाला वेळ लाईट मिळत नाही ” या मागणी वरून मंत्री विखे पाटील यांनी ही बाब लक्षात घेवून तातडीने गावठान वरून या वस्तींना स्ट्रेट लाईट देण्याचे महावितरण कंपनीने आदेश देत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले . त्यानुसार सहा महिन्यातचं स्ट्रेट लाईटचे काम सुरु झाले . 

oplus_1024

या शुभारंभ प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे , ग्रा प सदस्य संजय जाधव , ग्रा प राजू कडाळे , माजी पोलिस अधिकारी भाऊसाहेब चव्हाण , सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र जाधव , पाडूरंग सांगळे , नानासाहेब तळेकर , हौशाभाऊ जाधव , रामराव घुगे रविंद्र खंडाळे , खंडू खेडकर , बाबासाहेब हजारे , संतोष चव्हाण , सानप आदीसह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .

वीज महामंडळाच्या गलथान कारभारामुळे एकाचं स्ट्रेट लाईट कामाचा शुभारंभ दोन वेळस करण्यात आला . अदल्या दिवशी थोरात गटाच्या असणाऱ्या संरपच गणपत हजारे व कार्यकर्त्यांच्या हस्ते तर दुसऱ्या दिवशी विखे गटाच्या कार्यकर्त्याच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ करण्यात आले. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *