आश्वी । झुंजार न्यूज

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल माजी खा.डॉ. सुजयदादा विखे पाटील व सर्व नुतन संचालकांचा सत्कार समारंभ सोमवार दि. २३।६।२०२५ रोजी सायं. ७.०० वाजता आश्वी बु॥ ( म्हसे वस्ती ) येथे निळकंठेश्वर प्रतिष्ठाण व दिग्विजय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे .
नुकत्याचं झालेल्या आशिया खंडातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या डॉ पदमश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका नुकतीच बिनविरोध निवड झाली होवून डॉ सुजय विखे पाटील हे चेअरमन झाले यात नव्या दमाच्या तरुणांसह अनुभवी लोकांचा संचालक मंडळात मेळ घालण्यात आला .
या नुतन चेअरमन , व्हा चेअरमन व संचालकांचा आश्वी बु ॥ येथील निळकंठेश्वर प्रतिष्ठाण व दिग्विजय मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे . तरी होणाऱ्या कार्यक्रमास परिसरातील पदाधिकारी , कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *