मंगळवार, दि. २४ जून २०२५ रोजी दुपारी १२.०० वाजता
आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथील तळेगांव फाटा येथील वसंत गवळी यांच्या फार्म हाऊस येथे मंगळवार दि. २४ जून २०२५ रोजी दुपारी १२ वाजता परिट ( धोबी ) समाज्याचा जिल्हास्तरिय मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष शिवाजी रोकडे यांनी दिली .

या मेळाव्याकरिता परिट समाज प्रदेशाध्यक्ष खंडेराव कडलग , महासचिव सुनिल फंड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

परिट ( धोबी ) समाज्याचे अनेक प्रश्न प्रबलित असून शासन दरबारी याबाबत आवाज उठविला जाणार त्याकरिता समाज्याच्या अडी अडचणी समजावून घेण्याकरिता संगमनेर तालुक्यातील वडगांव पान येथे
संगमनेर तालुका परिट (धोबी) समाज बहुउद्देशीय संस्था वतीने उत्तर जिल्हास्तरिय मेळाव्याचे वसंत बबन गवळी यांचे फार्म हाऊस, कृषी उत्पन्न उपबाजार समिती शेजारी (तळेगाव फाटा) येथे आयोजन करण्यात आले आहे .
