आश्वी । झुंजार न्यूज
भारतीय जनता पक्षाचे अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांचा जाणीवपूर्वक खोटे नाटे आरोप करत त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई करीत असून त्यांच्यावर कायदेशिर कारवाई व्हावी अशी मागणी डॉ आण्णाभाऊ साठे एकता समितीचे अध्यक्ष शरद भडकवाड यांनी पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात केली आहे .

नितीन दिनकर हे भाजपाचे उत्तर जिल्हाध्यक्ष असून त्यांच्या घरगुती कार्यक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडिया व प्रसारमाध्यमांकडे तृप्ती देसाईने देत त्यांना बदनाम करण्याचे काटकारस्थान करत त्यांच्या राजीनामाची मागणी करत आहेत ही चुकीची बाब असून त्यांना हा नैतिक अधिकार कोणी दिला तर नितीन दिनकर यांनी प्रसारमाध्यमासमोर पुराव्यानिशी सदर व्हिडिओ बाबत स्पष्टीकरण दिले आहे परंतु जबाबदार एका राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याला विनाकारण बदनाम करण्याचे कारस्थान करणाऱ्या तृप्ती देसाई वर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे .

नितीन दिनकर यांच्यावरील केलेले आरोप हे बिनबुडाचे असून याबाबत आश्वी पोलीस स्टेशन येथे एकता समितीचे अध्यक्ष शरद भडकवाड यांनी निवेदन देऊन कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे

यावेळी डॉ अण्णाभाऊ साठे एकता समिती अध्यक्ष शरद भडकवाड , सचिन बोरुडे , संजय भडकवाड , संतोष बर्डे , तुळशीराम भडकवाड , योगेश राक्षे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते”

