शिवराज्य निर्माण संघटनेचा आठवा वर्धापन दिन मंगळवार, २२ जुलै २०२५ रोजी शिवनेरी किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
Oplus_131072
या कार्यक्रमाला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रणजितसिंह देशमुख आणि शेकडो युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
Oplus_131072
कार्यक्रमाची सुरुवात जुन्नर तालुक्यातील ओझर येथील विघ्नहर्ता श्री गजानन गणपतीच्या दर्शनाने झाली. तेथे देवस्थान ट्रस्टच्या वतीने रणजितसिंह देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर, कार्यकर्ते शिवनेरी किल्ल्याकडे निघाले. शिवनेरीवर आगमन होताच नगरसेवक भाऊ कुंभार यांनी देशमुख यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.
Oplus_131072
किल्ल्यावर ‘शिवाई’ देवीची विधिवत पूजा आणि आरती रणजितसिंह देशमुख यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Oplus_131072
याप्रसंगी शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि इतिहास संशोधक दीपक कर्पे यांचे व्याख्यान झाले. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन संघर्षावर आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेवर प्रकाश टाकला. संगमनेर तालुक्यालाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा लाभला आहे, असे त्यांनी सांगितले. रणजितसिंह देशमुख यांनी आजच्या तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती आणि शिवभक्ती जागृत करून छत्रपतींचे विचार पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य सुरू केल्याबद्दल कर्पे यांनी त्यांचे कौतुक केले.
Oplus_131072
संघटनेचे संस्थापक रणजितसिंह देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले की, संघटना शाहू महाराज आणि अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक समतेचा आणि संघर्षाचा वारसा पुढे घेऊन जात आहे. धर्मकार्याबरोबरच समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना मदत करणे, हे संघटनेचे ध्येय आहे. भविष्यात कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामकाज, समाज प्रबोधन आणि नेतृत्व विकासाचे प्रशिक्षण दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.