संयम आणि संवादातून सोडवला पेच!

 

 

 

लोणी । झुंजार न्यूज

 

 

 

 

मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष या नात्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय संयमाने आणि सर्वाशी संवाद साधत मागील ९६ तास घेतलेल्या मेहनतीचे यश जरांगे पाटील यांचे आंदोलन यशस्वी करण्यात अधोरेखीत झाले आहे.यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकाराणातील एक प्रभावशाली मराठा चेहरा म्हणून समोर आला आहे.

 

 

 

 

मागील चार दिवसांपासून सर्वाचे लक्ष मुंबईतील मराठा आरक्षणाच्या आंदोलनाकडे लागले होते.तणावग्रस्त परीस्थीतीत काय निर्णय होतो यातच राज्याचे राजकारण केंद्रीत झाले होते.ऐन गणेश उत्सवात निर्माण झालेल्या या परीस्थितीतून बाहेर कसे पडायचे आशा पेच प्रसंगात सरकारही होते.

जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची वेळ जशी जवळ येवू लागली त्याक्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदी मंत्री विखे पाटील यांची नियुक्ती केली.

 

 

अवघ्या काही दिवसात आलेली जबाबदारी यशस्वी करून दाखविण्याचा निश्चय विखे पाटील यांनी केला.समितीच्या सर्व सदस्यांना एकत्रित करून त्यांनी जरांगे पाटील यांच्या प्रत्येक मागणीवर कायदेशीर दृष्टीने अभ्यास करून त्याला कायदेशीर आधार देण्यासाठी मागील ९६ तास सलग राॅयल स्टोन बंगल्यावर बैठकांचा सिलसिला सलग सुरू ठेवला.वेळ पडेल तसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी रात्री उशिरा पर्यत बैठका करून जरांगे यांच्या मागणीला शासन स्तरावरून मूर्त स्वरूप दिले.

 

 ।

मंत्री विखे पाटील यांचे नेतृत्व मुळातच संयमी आणि तेवढेत धडाडीचे आहे.एखादी जबाबदारी घेतली की पूर्ण करायची हा त्यांचा निश्चय असतो.मराठा आंदोलनाच्या निमिताने पुन्हा एकदा राज्याला त्याची प्रचिती आली.

 

 

.यापुर्वी सुध्दा मराठा आंदोलनातील सक्रीय सहभाग त्यांचा लक्षवेधी राहीला.राज्यातील सर्व मराठा संघटनाच्या पदाधिकारी अभ्यासक आणि कार्यकर्त्यांशी त्याचा राहीलेला संवादाने निर्माण केलेल्या विश्वासाचे यश यानिमित्ताने समोर आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *