{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":2},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंजार न्यूज

संपूर्ण देशासाठी सहकाराचे आदर्श मॉडेल ठरलेल्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा १२ ते १४ सप्टेंबर दरम्यान कारखाना कार्यस्थळावरील कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील अमृतेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आ. डॉ. सुधीर तांबे या सभांना उपस्थित राहणार आहेत.

 

 

 

१२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता संगमनेर सहकारी शेतकी संघाची वार्षिक सभा चेअरमन संपत डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली, तर १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सभा सभापती शंकर खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची वार्षिक सभा चेअरमन रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 

 

१३ सप्टेंबरला सकाळी ९ वाजता राजेंद्र गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली हरिश्चंद्र फेडरेशनची वार्षिक सर्वसाधारण सभा, तर सकाळी १० वाजता राजेंद्र कडलग यांच्या अध्यक्षतेखाली गरुड कुकूटपालन सहकारी संस्थेची वार्षिक सभा होणार आहे. सकाळी ११ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुधाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. रविवारी दुपारी १ वाजता सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

 

 

सर्व वार्षिक सभांना आमदार सत्यजित तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात, माधवराव कानवडे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे यांच्यासह अमृत उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या वार्षिक सर्वसाधारण सभांसाठी सभासद व उत्पादक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे व्हा. चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे व्हा. चेअरमन राजेंद्र चकोर, बँकेचे व्हा. चेअरमन ड. नानासाहेब शिंदे, शेतकी संघाचे व्हा. चेअरमन सुनील कडलग, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड यांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *