राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणीस ग्रामविकास मंत्री ना जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना राधाकृष्ण विखे पा यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातुन पिंप्री लौकी अजमपुर गाव हे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने तन मन धनाने एकत्र येवुन आदर्श गांव पुरस्कारासाठी भाग घेऊन गावाच्या सर्वागिण विकासाठी सर्वजण प्रयत्न करतील असा आत्मविश्वास सा कार्यकर्ते भारत पा गिते यांनी पंचायत राज अभियानाची महत्वाची ग्रामसभा आयोजित केली त्या प्रसंगी बोलतांना केले .
या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी संरपंच सौ संगिता गिते होत्या . या प्रसंगी ज्येष्ठ्र कार्यकर्ते भाऊसाहेब लावरे कैलास दातीर यांनी मनोगत व्यक्त केले ग्रामसेवक श्री भारत सोनवणे यांनी पंचायतराज अभियानाच्या नियमावलीचे वाचन केले .
याप्रसंगी गिते बोलतांना म्हणाले मुख्यमंत्री पंचायत राज मध्ये भाग घेण्यास आपल्या गावाची अनुकुल परिस्थिती आहे गावाच्या विकासात भर घालणारे गावाला जोडणारे रस्ते चांगले आहे गावाला पाणी पिण्याचे पुरवठा करणारी योजना उत्कृष्ठ्र काम करते गावातील अंगणवाडी ते माध्य शाळा डिजिटल आहे गावाअंतर्गत रस्ते बचतगट प्राथामिक आरोग्य केंद्र सहकारी संस्था जलसंधारण पाणी अडवा पाणी जिरवा मध्ये गावाचे उल्लेखनिय काम आहे भविष्यकाळात संतगाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान वंसुधरा अभियान लोकसहभाग व्यसनमुक्ती बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षम करणे गावाच्या हिताच्या विकासाच्या योजना राबवणे ही कामे झपाट्याने करून आदर्श गांव चळवळ बळकट करावी लागेल . गांव व्यसनमुक्त करणे गावात सांस्कृतिक सभागृह बांधणे लोक वर्गणीतून वैकुंठ रथ घेण्यास ग्रामस्थांनी सर्वापत्तरी मदत करण्याचे आश्वासन दिले
शाशनाच्या नियमावली प्रमाणे आज गावात आदर्श गांव योजनेचे ७०% काम प्रतीपथावर असुन ग्रामस्थांच्या महिलांच्या युवक युवतीच्या सहकार्याने ३० % काम करून राज्यात सुरु असलेल्या पंचायत राज आदर्श गांव योजनेत पिंप्री लौकी अजमपुर गांव प्रथम क्रमांकचे बक्षीसास पात्र ठरेल असा आत्मविश्वास भारत पा गिते यांनी व्यक्त केला
ग्रामसभेसाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होत आभार उपसरपंच बाजीराव गिते यांनी मानले