आश्वी । झुंजार न्यूज
गेल्या तीन वर्षाच्या प्रतिक्षेनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला वेग आला असून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दिवाळीच्या फटाक्यानंतर निवडणुकीचे फटाके वाजणार असल्याने सोमवारी याबाबत गट व गणाची सोडत झाली यामध्ये राजकिय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील आश्वी जिल्हा परिषद गटाला ओबीसी महिला तर आश्वी खुर्द व आश्वी बुद्रुक गणाला दोन्ही महिला सोडत निघाल्याने गुडघ्याला बाशिंग बाधून बसलेल्या पुढाऱ्यांची घोर निराशा झाली असून आश्वी गटावर महिला राज पुन्हा एकदा येणार हे निश्चित झाले असून विखे – थोरातांच्या भूमिकेकडे सर्वाच्या नजरा लागल्याचे चित्र दिसत आहे

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील आश्वी जिल्हा परिषद गट पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व बाळासाहेब थोरात यांचा सहकार क्षेत्रातील मोठा बाल्लेकिला समजला जातो. निवडणुकांसाठी दोन्ही आजी माजी मंत्र्यांनी आप – आपल्या कार्यकत्यांची फौज तैनात केली आहे. हा गट निवडणुकीमध्ये प्रतिष्ठेचा ठरणार आहे. गट ओबीसी महिला तर दोन्ही गण सर्व साधारण महिलासाठी जागा राखिव झाल्या आहे.
सध्या थोरात यांच्याकडून (काँग्रेस) आश्वी बुद्रुकचे माजी उपसंरपच तथा शाळीग्राम होडगर यांचे भाचे राहुल जऱ्हाड यांच्या पत्नी सौ रुपाली जऱ्हाड , सह्याद्री बहुजन संस्थेचे संचालक डॉ संजय सांगळे यांची सौ मनिषा सांगळे पत्नी तर विखे पाटील (भाजप) कडून पिंप्री लौकी अजमपूर च्या संरपच सौ संगिता भारत गीते , सौ सुनंदा वाणी या दोन नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. उमेदवार कोणीही असो, मात्र विखे थोरातांमुळे या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे. आधी जिल्हा परिषद गट प्रवरा ४० गाव परिसरात असल्याने बऱ्याच वर्षांपासून विखे परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळली आहे. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा हा बालेकिल्ला समजला जातो, तर विविध सहकारी संस्थांच्या माध्यमांसह जुन्या ऋणानुबंधांमुळे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रभाव या परिसरावर आहे.
विखे गटाचे सौ संगिता भारत गिते, ॲड सुनंदा पोपट वाणी , माजी जि प सदस्या सौ रोहीनी किशोर निघुते , सौ कांचन राजेंद्र मांढरे तर थोरात गटाकडून सौ रुपाली राहुल जऱ्हाड , शेडगांवच्या माजी संरपच सौ शोभा दिलीप नागरे , सौ शितल जगजीवन उगलमुगले संध्या ही नावे चर्चेत आहे. मोहीत गायकवाड यांनी निवडणुकीच्या तयारी केली होती मात्र महिलाराज मुळे त्यांनी संध्यातरी माघारी घेतल्याचे दिसत आहे. महायुतीचा धर्म पाळून ही जागा रिपब्लिकन पक्षाला मिळावी म्हणून आशिष शेळके प्रयत्नशील आहे तर माजी पंचायत समितीचे माजी विरोधी पक्ष नेते संरुनाथ उंबरकर हे सुध्दा आपली पत्नी सौ सविता उंबरकर यांच्या उमेदवारीकरिता प्रयत्नशील असून त्याकरिता ते राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून उमेदवारीची मागणी करणार असल्याचे दिसत आहे .
आश्वी गटामध्ये आश्वी बु. ( थोरात), निमगावजाळी (थोरात) चिंचपूर (थोरात), सादतपूर (विखे) औरंगपूर (थोरात), प्रतापपूर ( विखे), मांची हिल (थोरात), आश्वी खुर्द (विखे), शिवलापूर (थोरात), शेडगाव (थोरात), हंगेवाडी (थोरात) पिंप्री लीकी अजमपूर ( विखे), झरेकाठी ( थोरात) खळी (दोन्ही एकत्र), दाढ खुर्द ( विखे) तर, चणेगाव (थोरात) ही गावे येतात. बहुतांश ठिकाणी थोरात गटाचेच सरपंच आहेत, मात्र विधानसभा निवडणुकीत या सर्व गावांमधून राधाकृष्ण विखे पाटील यांना अधिक मताधिक्क्य मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती गणा करिता’ही नावे सध्या चर्चेत..!
आश्वी जिल्हा परिषद गट हा ओबीसी महिला झाली तर , आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द गण हे सर्व साधारण महिला झाल्याने आश्वी बुद्रुक गणातून थोरातांकडून सौ मिना अनिल थेटे ‘ चिंचपूर चे माजी संरपच विवेक तांबे यांच्या पत्नी सौ आरती तांबे , तर विखे गटाकडून माजी पंचायत समिती सदस्य सौ दिपाली डेंगळे सुजाता थेटे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. आश्वी खुर्द गणातून थोरातांकडून शिबलापूर सरपंच प्रमोद बोंद्रे यांच्या पत्नी सौ नेहा बोंद्रे , सह्याद्री संस्थेचे संचालक डॉ संजय सांगळे यांच्या पत्नी सौ मनिषा सांगळे , सौ रंजना नवनाथ आंधळे, सुरेश फड यांच्या पत्नी तर विखे गटाकडून माजी पं स सदस्य सखूबाई निवृत्ती सांगळे , सौ पुनम मंजित गायकवाड , आदीसह अनेकांची यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
आश्वी गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी अगदी गढघ्याला बाशिंग बांधले होती. हीसे नौसे गवसे या ना त्या मागनि निवडणूक लढविण्याची इच्छा नेत्यांकडे प्रगट करीत असल्याचे चित्र सुध्दा दिसले मात्र महिला राखी झाल्याने सर्वांचा हिरमोड झाल्याचे चित्र दिसत असले तरी विखे – थोराताची मात्र महिला आरक्षाणामुळे डोके दुःखी नक्कीचं थांबली !





