विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराला ग्रामस्थांची उत्स्फूर्त दाद; मान्यवरांची मोठी उपस्थिती
उंबरी बाळापूर । झुंझार न्यूज
लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील पद्मभूषण उपाधीने सन्मानित प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, प्रवरा माध्यमिक विद्यालय उंबरी बाळापूर येथे २४ डिसेंबर २०२५ रोजी ‘विविध गुणदर्शन’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त गुणांचे दर्शन घडवत विविध कलाप्रकार सादर केले, ज्याला उपस्थित ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे अध्यक्ष रामभाऊ पाटील भुसाळ होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोकुळभाऊ दिघे, शिवाजी भुसाळ, पोपटराव उंबरकर, भागवतराव उंबरकर, तुळशिराम म्हस्के, रंगनाथ उंबरकर, सुवर्णाताई भुसाळ, भिकाजी खेमनर, शैलजा नावंदर, पोलिस पाटील सौ वैशाली मैड , तात्यासाहेब भुसाळ, सुरेश बाम्हणे, नामदेव भुसाळ, संजय उंबरकर, गणेश भुसाळ, डॉ. प्रशांत उंबरकर, निलेश निर्मळ, बाळासाहेब पाटील भुसाळ, सुरेश भुसाळ, विलास उंबरकर, संपत पाटील भुसाळ, ॲड. रविंद्र शेळके, संदीप भुसाळ यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेली विविध नृत्ये, नाटके आणि गीते. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता. शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून करून घेतलेली कसून प्रॅक्टिस आणि रंगीत तालीम यामुळे प्रत्येक सादरीकरण दर्जेदार झाले. याबद्दल ग्रामस्थांनी शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
या आनंददायी प्रसंगी श्री. तात्यासाहेब कारभारी पाटील भुसाळ यांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट मिष्टान्नाचे भोजन दिले. त्यांच्या या दातृत्वामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.
शाळेत अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. शिक्षकांनी घेतलेली मेहनत कौतुकास्पद असून, भविष्यातही असे उपक्रम राबवले जावेत,” अशी भावना उपस्थित पालकांनी व ग्रामस्थांनी व्यक्त केली. संपूर्ण गावकरी शिक्षकांच्या या कार्याबद्दल ऋणी असल्याचे त्यांनी सांगितले.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. रसाळ सर, सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .