संगमनेरचे माजी आमदार थोरात यांना तालुक्यातील काही गावांचा अचानक पुळका आला आहे आणि आता त्यांनी गावोगाव शेतकरी मेळावे घेण्यास सुरुवात केली आहे निदान यानिमित्ताने का होईना ते गावागावांत फिरत आहेत याचा आनंदच आहे परंतु शेतकरी मेळावे घेण्याआधी परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर कारखान्यात नेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा मग शेतकरी मेळावे घ्यावेत. माजी आमदार थोरात नेहमीच आपल्या भाषणातून “कनोली ,मनोली,कनकापूर आणि दाढ, चनेगाव, हसनापूर ” असे म्हणून मी राज्याचा नेता आहे विखेंच काय ते याच गावांत फिरत असतात असे बोलत होते मग आता गावोगाव शेतकरी मेळावे का ? अशा कठोर शब्दांत भाजपाचे तालुकाध्यक्ष गोकुळ दिघे यांनी माजी आमदार थोरात यांचा समाचार घेतला आहे.
दरम्यान ,गत ४० वर्ष जोर्वे गटात एकही लोक हिताचं काम न करता केवळ आश्वासन व भूल थापांच्या जोरावर राजकारण करणाऱ्या माजी मंत्र्यांना अचानक पिंपरणे गावाचा व आसपासच्या गावांचा इतका पुळका का आला हे समजण्या पलीकडचेच आहे , मागील जि प सदस्य व पं स सदस्य यांचे एक तरी काम जोर्वे गटात दाखवा किंवा सात वर्षात सदस्यांनी एकदा तरी गटातील एका तरी गावाला भेट दिली का असे जाहिर पणे सांगावे, सत्ता बदल झाल्यानंतर आमदार अमोलभाऊ खताळ व पालक मंत्री विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांच्या निधी मंजूर होऊन काही दिवसापूर्वी एकट्या पिंपरणे गावात १० कोटी रुपयांचे विविध विकास कामाचे भूमिपूजने देखील विखे पाटील व आमदार अमोलभाऊ खताळ यांच्या उपस्थिती झाली आहे. त्याच गोष्टीतून वैफल्यग्रस्त होउन माजी आमदारांनी शेतकरी मेळावा या नावाखाली लोकसंवादाचा केविलवाणा प्रयत्न केलेला दिसत आहे.
वास्तविक आजही जोर्वे गटातील किती तरी गावे विकासापासून व मूलभूत सुविधांपासून वंचित आहे .आम्ही जोर्वे गटातील विविध गावांचा आढावा घेत असताना रस्ते वीज पाणी तसेच शेतकऱ्याचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. डीग्रस, कोळवाडे ,अंभोरे असे किती तरी गावामध्ये पाई चालता येतील असे सुद्धा रस्ते नाहीत. जाधव वस्ती (ठाकरवाडी) या ठिकाणी तर महिलांची अजून आधार कार्ड सुधा झालेले नाहीत.पाचशे लोकसंख्या असलेल्या वस्तीवर अंगणवाडी सुद्धा नाही हि बाब खरोखर ४० वर्ष आमदारकी मंत्रिपद उप भोगलेल्या लोकप्रतिनिधीसाठी अत्यंत शरमेची आहे .शेतकरी मेळावा घेऊन आपण लोकांसाठी काय करणार आहोत याच उत्तर भावी मुख्यमंत्र्यांनी द्यावे,कोळवाडे, डिग्रस गावासाठी पाट जाऊनही शेतकऱ्यांना पाणी नाही .धारण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था झाली आहे. मग सदर गावांना उपसा सिंचन योजनेसाठी आपण काही प्रयत्न का केले नाही असेही गोकुळ दिघे यांनी म्हटले आहे , पिंपरणे गावासाठी काय केले व भविष्यात काय करणार आहेत हे देखील माजी आमदारांनी स्पष्ट करावे.कुठलेही काम न झाल्यामुळे लोकांना दिलेली आश्वासन पूर्ती न झाल्याने पिंपरणे ग्रामस्थांचा प्रचंड रोष होता. त्यातूनच काही दिवसापूर्वी सरपंच ,सदस्य तसेच विविध पदाधिकारी यांनी अमोल भाऊ खताळ यांचा शिव धनुष्य हाती घेऊन विकास कामे तात्काळ मार्गी लावली .जनतेने ही त्यांना भरभरून साथ दिली याच गोष्टीची सल मनात धरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी व भावी मंत्र्यांनी ह्या बेगडी शेतकरी मेळावा चे आयोजन केलेले दिसते तसेच संगमनेर तालुक्यातून पंजा गायब करून मेवा समिती स्थापन करून धन शक्तीच्या जोरावर निवडून आलेले नगर सेवक व नगराध्यक्ष यांचा सत्कार ग्रामीण भागात करून कोणती नवीन दिशाभूल केली जात आहे हा प्रश्नही सर्व सामान्य गावकऱ्यांना पडला आहे वास्तविक गाव गावचे अनेक प्रश्न गेली ४० वर्ष प्रलंबित असताना जनतेने यांच्या नाकर्तेपणाला कंटाळून महायुती व आमदार अमोल भाऊ खताळ यांच्या वर विश्वास ठेवून यांना सपशेल नाकारले आहे हे गेल्या विधान सभा निवडणुकीत सिद्ध झाले आहे.
तसेच जलसंपदामंत्री मा राधाकृष्ण विखे पाटिल साहेब यांच्याकडे जिल्ह्याचे पालकत्व असल्याने सर्वसामान्य जनतेच्या ग्रामीण विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहे व प्रत्येक गावात विकास निधी उपलब्ध होऊ लागला आहे आपण फक्त नेहमीप्रमाणे विकासात खोडा घालण्याचे काम करू नये.आधी शेतकऱ्यांना न्याय द्यावा मग मेळावे घ्यावेत असे मत त्यांनी व्यक्त केले.