💥रविवारी महंत दत्तगिरी महाराजाच्या हस्तें अभिषेक

🟪मंगळवारी ह.भ.प. भास्करगिरी महाराजयांची सप्ताहास भेट

🎈पंचक्रोशीतील भाविकानीं त्रिदिनी सप्ताह सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन

 

आश्वी झुंझार न्यूज 

 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल ग्रामस्थांचे श्रध्दांस्थान असलेल्या बालब्रम्हचारी शिवभक्त पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त सोमवार दि. १९ ते बुधवार दि. २१ जानेवारी २०२६ रोजी पूंजाआई मंदिर प्रागंणात त्रिदिनी सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आश्वी खुर्द ग्रामस्थानी दिली आहे.

 

 

पुजांआईने गोदावरी नदीकिनारी असलेल्या शिवमंदीरात १२ वर्ष तपश्चर्या केली होती. त्याचे जन्मगाव पुनतगाव (ता. नेवासे) असले तरी आश्वी खुर्द गाव हेच त्याची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. पुजांआईने गावात महादेव, मारुती व खंडोबा मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी महत्त्वाचे योगदान दिले. पुजांआईने आश्वी खुर्द गावामध्ये भक्तीची सुरवात केली, परंतू कधीही अधंश्रध्देला खतपाणी घातले नाही. देवगडचे मठाधीपती भास्कंरगिरी महाराज हे पुजांआईला आपली आई मानतात गुरुवर्य किसनगिरी महाराज त्यांना गुरु भगिनी मानत आश्वी खुर्द प्रमाणेचं पुंजाईचे श्रीक्षेत्र देवगड जवळ असलेल्या बकुपिंपळगाव प्रवरासंगम व जन्मगाव पुनतगाव येथ भव्य मंदिरे असून या तीनही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुजांआईची पुण्यतिथी साजरी केली जाते. यावेळी उपस्थित भाविकाना महाप्रसादाचे वाटप केले जाते.

दरम्यान आश्वी खुर्द येथे रविवार १८ जानेवारी रोजी सकाळी ८ वा रामेश्वर उम्रेश्वर मठाचे मंहत ह. भ. प. दत्तगिरी महाराज यांचे हस्तें अभिषेक केला जाणार आहे
तर सोमवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी पुंजाआईचे चरित्र पारायण वाचन ह. भ. प. सुनील महाराज पवार हे करणार आहेत. तर यावेळी पुंजाआई महात्म ग्रंथ दुर्गासप्तशांती पाठ व आरती होणार आहे
सायंकाळी हरिपाठ त्यांनंतर ह. भ. प. सुनिल पवार महाराज यांचे अमृतूल्य किर्तण व त्यानतंर उपस्थित भाविकासाठी महाप्रसादाचाचे वाटप दुसऱ्या दिवशी मंगळवार दि. २० जानेवारी सकाळी ८ वा. देवडगड देवस्थानचे प्रमुख आयोध्या व पंढरपुर देवस्थानचे ट्रस्टी व प.पु . पुंजाआई यांना आई मानणारे शांतीबम्ह मंहत ह.भ.प. भास्करगिरी ( बाबाजी) महाराज यांची सप्ताहास भेट संतपुजन व प्रवचन होणार आहे त्यांनंतर महाप्रसाद दुपारी पुंजाई महात्म्य ग्रंथ पारायण सांयकाळी हरिपाठ व त्यांनतर ज्ञानेश्वरी कंठस्थ भागवताचार्य ह.भ.प. भागवत महाराज बादाडे ( बिडकर) यांचे किर्तन व त्यांनंतर महाप्रसाद तर बुधवार दि. २१जानेवारी सकाळी पुंजाआई ग्रंथ पारायण वाचन सोहळा त्यानंतर सांयकाळी ४ वा. रथ मिरवणुक हारिपाठ सांयकाळी ६ वा. देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. प्रकाशनंद गिरी ( स्वामीजी) महाराज यांचे काल्याचे किर्तन व त्यांनंतर आंमटी भाकरीचा महाप्रसाद होणार आहे

 

अहिल्यानगर जि.प.च्या माजी अध्यक्षा सौ.शालिनिताई विखे पाटील हया बुधवार दि.२१ जानेवारीला सप्ताहास भेट देणार असुन यावेळीत्यांच्या हास्ते महिला हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडणार असुन परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आश्वी खुर्द ग्रामस्थांनी केले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *