मुंबई । झुंझार न्यूज 

 

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयाचे पडसाद आज मुंबईत उमटले. या दणदणीत विजयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री (उपमुख्यमंत्री) मा. देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयात पेढा भरवून विशेष अभिनंदन केले. या विजयामुळे अहिल्यानगरमध्ये भाजपचे वर्चस्व अधिक घट्ट झाले असून, राजकीय वर्तुळात या विजयाची मोठी चर्चा होत आहे.

अहिल्यानगरचे नाव बदलल्यानंतर झालेली ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची होती. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपने या निवडणुकीत नियोजनबद्ध आखणी केली होती. मुंबईतील पक्ष कार्यालयात विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. “हा विजय केवळ विकासाचा नसून जनतेने भाजपवर दाखवलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे,” अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.


अहिल्यानगर जिल्हा हा पारंपरिक दृष्ट्या विखे पाटील आणि इतर दिग्गज नेत्यांच्या प्रभावाखाली राहिला आहे. मात्र, महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवणे हे भाजपसाठी मोठे आव्हान होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप व इतर सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन, स्थानिक समीकरणे जुळवत विरोधकांना धूळ चारली. या विजयाचे मुख्य श्रेय विखे पाटील यांच्यासह डॉ सुजय विखे पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या दांडग्या जनसंपर्काला आणि रणनीतीला दिले जात आहे.

यावेळी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, डॉ सुजय विखे पाटील व आमदार संग्राम भैया जगताप यांचे दुरदृष्टी नियोजन व अहिल्यानगरच्या जनतेने विकासाला दिलेली साथ तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या जनहितकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचल्यामुळेच हा ऐतिहासिक विजय शक्य झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे , यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही निवडणूक लढवली आणि जिंकली. आता शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

अहिल्यानगर महापालिकेवरील या विजयामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात यावेळी पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच ‘भारत माता की जय’ आणि ‘भारतीय जनता पक्षाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

या विजयामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात आता नवे पर्व सुरू झाले असल्याचे मानले जात आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *