झरेकाठी । झुंझार न्यूज

 

 

 

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचाच्या कार्यकर्त्यांनी निळवंडे उजव्या कालव्या मधून शेतकऱ्यांना बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळवण्यासाठी एक लेखी निवेदन जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे दिले होत त्या निवेदनाची दखल घेऊन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील महोदयांनी अधिकाऱ्यांना तात्काळ सवैक्षण करण्याचे निर्देश दिले आहे,

त्यामुळे झरेकाठी येथील दोन्हीही कालव्याच्या पाण्याच्या लाभापासून वंचित असलेले शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे अंदाजे जवळपास 500 शेतकऱ्यांना उजव्या कालवा निळवंडे या बंदिस्त पाईपलाईन द्वारे पाणी मिळणार आहे
त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळणार आहे

 

बऱ्याच वर्षापासून ह्या परिसराला कालव्याचे पाणी मिळत नव्हते आता जलसंपदा मंत्री यांच्यामुळे या परिसराला उजव्या कालवा निळवंडे बंदिस्त पाईपलाईन द्वारे शेतकऱ्यांना पाणी मिळणार आहे त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी व जनसेवा युवा मंच सदस्यांनी अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन केले आहे
बऱ्याच वर्षांनी हा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे
याचबरोबर जनसेवा युवा मंच सदस्य यांनी पालकमंत्री यांच्याकडे मंजूर घरकुलासाठी शासनामार्फत वाळू मिळण्यासाठी एक निवेदन दिले होते त्या निवेदनाची दखल घेऊन पालकमंत्री यांनी घरकुलांसाठी वाळू उपलब्ध करून देण्याच्या सूचना संगमनेर तहसीलदार धीरज मांजरे यांना दिल्या आहेत

 

याप्रसंगी जनसेवा युवा मंचचे सदस्य राहुल वाणी, सोमनाथ डोळे, स्वप्निल वाणी, डॉ. नवनाथ वाणी, तुषार वाणी, रमेश डोळे, अभिनव वाणी, जयदीप तोंडे, सुहास वाणी, जालिंदर वाणी, ह. भ. प श्रीकांत महाराज दाभाडे, आधीसह उपस्थित होते

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *