आश्वी । झुंझार न्यूज 

भारतीय संस्कृती, परंपरा आणि सणांचे महत्त्व नव्या पिढीला समजावे, या उद्देशाने संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलमध्ये हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमधील आपुलकी, स्नेह आणि एकोप्याची भावना वृद्धिंगत करत सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.


याप्रसंगी काँग्रेसच्या जिल्हा नेत्या सौ. प्रभावती घोगरे, अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या सचिव सौ. शरयुताई देशमुख, सौ. अरुणा हिंगे, सौ. शितल उगलमुगले, सौ. शुभांगी थोरात आणि सौ. मनिषा संजय सांगळे आदि मोठया संख्येने महिला उपस्थित होत्या.


यावेळी काँग्रेस नेत्या सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, हळदी-कुंकू हा केवळ एक पारंपारिक विधी नसून, त्या निमित्ताने समाजातील विविध स्तरांतील महिला एकत्र येतात. अशा कार्यक्रमांमुळे महिलांना एकमेकींशी संवाद साधता येतो आणि विचारांची देवाणघेवाण होते, जी समाज प्रबोधनासाठी गरजेची आहे.

तर अमृतवाहिनी संस्थेच्या सचिव सौ. शरयुताई देशमुख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, स्त्री ही खऱ्या अर्थाने समाजाच्या एकीकरणाचा मुख्य दुवा आहे. महिलांना सामाजिक दृष्टिकोनाची अधिक जाण व्हावी आणि त्यांच्यातील नेतृत्वगुणांना वाव मिळावा, यासाठी हळदी-कुंकू हे एक उत्तम माध्यम आहे. शाळेत अशा कार्यक्रमांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांवरही चांगले संस्कार होतात.

 हळदी-कुंकूसारख्या पारंपरिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना सणांचे महत्त्व समजते आणि परंपरा जपण्याची प्रेरणा मिळते. महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देत हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सह्याद्री इंटरनॅशनल स्कूलने या माध्यमातून केला.कार्यक्रमासाठी शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने पालक महिला उपस्थित होत्या.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *