आश्वी । झुंझार न्यूज

अजित दादा पवार हे त्यांच्या शिस्तीसाठी, प्रशासनावरील मजबूत पकडीसाठी आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात होते. ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुती आणि संपूर्ण राज्याचे मोठे नुकसान झाले आहे.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य श्री. सरूनाथ उंबरकर यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

 

 

श्रद्धांजली वाहताना उंबरकर म्हणाले की, “अजित दादांचे निधन ही बातमी पचवणे अत्यंत कठीण आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्यासारखा निर्भीड नेता पुन्हा होणे शक्य नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा आमचा आधारवड आज हरपला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांची जागा कधीही भरून काढता येणार नाही.”

अजित दादांच्या निधनानंतर सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आणि दांडगा चाहता वर्ग पोरका झाला असल्याचे उंबरकर म्हणाले .

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *