संगमनेर तालुक्यातील चणेगांव येथे सालाबाद प्रमाणे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सप्ताह काळात नैमित्तीक काकडा भजन, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, हरिकिर्तन, भजन आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सप्ताह काळात अध्यात्मिक कार्यक्रमांबरोबरचं प्रवरा मेडिकल ट्रस्ट लोणी यांचे वतीने मोफत भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मार्ग दावुनी गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेची पंथे चालु जाता l न पडे गुंथा कोठे काही ll या उक्ती प्रमाणे संतानी दाखविलेल्या मार्गाने मार्गक्रमण केले असता जीवनातील अडथळे दुर होतात व जीवन सुखमय होते. याचीच अनुभुती या सप्ताह काळात आल्याचे पहावयास मिळाले.
या अखंड हरिनाम सप्ताह काळात लोकउपयोगी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने सात दिवस दररोज सायंकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत नामवंत किर्तनकारांचे किर्तनाचे आयोजन किर्तनसेवा संपल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासासाठी चणेगांवसह पंचक्रोशीतील भाविकांनी सप्ताह काळात किर्तनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी गावातुन ज्ञानेश्वरी ग्रंथाची भव्य मिरवणुक काढण्यात आली. मिरवणुकीनंत युवा किर्तनकार ह.भ.प.सचिन महाराज ढोले, छत्रपती संभाजीनगर यांच्या सुश्राव्य वानितुन काल्याची किर्तन सेवा पार पडली.
अहिल्यानगरचे पालकमंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील आणि विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष.डाॅ.सुजय विखे पाटील यांनी रामेश्वर देवस्थानला मोठा निधी दिल्याने अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत
श्री रामेश्वर बाबा अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी करण्यासाठी भास्कर पाटोळे, सोमनाथ गुळवे, बाजीराव खेमनर, हौशाबापु पाटोळे, ज्ञानेश्वर खेमनर, इंद्रभान ढमक, गणेश खेमनर, प्रवीण पाटोळे, सोमनाथ डोळे, अरुण धमक, सचिन भोसले, तुषार खेमनर, अशविजित पेटारे, महेश पावडे, अविनाश लोहाळे, सागर कदम, बाबासाहेब पाटोळे, सुनील पाटोळे, पुजारी लक्ष्मण बाबा, पोपट खेमनर, सुभाष पाटोळे, दीपक घोगरे, दत्तू ढमक आदी सह भाविक भक्त ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले