महात्मा फुले जयंतीनिमित्त संगमनेर येथे अभिवादन

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा भक्कम पाया रचला. त्यामुळेच आज महिलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या असून त्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत, असे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांनी काढले.

 

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर शहरातील त्यांच्या पुतळ्यास नीलम खताळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष पायल ताजणे नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह अर्चना चिपाडे, सुवर्णा ताजणे, नम्रता अभंग, मीनल अभंग, रेखा गलांडे, संगीता पुंड, मनीषा अभंग, अश्विनी ढोले, जोती बालसराफ, सांगिता मंडलिक, जयश्री पुंड, सविता पावबाके, सुनीता माताडे, बंटी मंडलिक, किशोर ढोले आदींसह माळी समाजाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात माळीवाडा येथील मारुती मंदिरात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून करण्यात आली.

 

यावेळी बोलताना खताळ म्हणाल्या की, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अंधश्रद्धा, जातिभेद आणि स्त्री-पुरुष असमानतेविरुद्ध लढा देत शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यांच्या कार्यामुळेच महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला. आज त्या शिक्षणाच्या बळावर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजाने पुढे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *