अभ्यासाबरोबर विदयार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळाल्यास भविष्यात हा विदयार्थी सुजान नागरिक बनेल                                                                       संगमनेर : झुंजार न्यूज

शिबलापूर व परिसरातील कार्यकार्त्याच्या सहकार्यातून कमी कालावधीतचं इंटरनॅशनल स्कुलची प्रगती होवू लागली असून भविष्यात स्कूलसह परिसर निश्चितचं सुंदरमय होवून नावारुपास असेल असे गौरोदगार माजी महसूल मंत्री तथा कॉग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी काढले .

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील इंटरनॅशनल इग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलन व सांस्कृतिक कार्यक्रम प्रसंगी आ बाळासाहेब थोरात बोलत होते .याप्रसंगी संगमनेर एज्युकेशन कॉलेजचे प्राचार्या सौ संध्याताई खेडेकर , माजी नगराध्यक्षा सौ दुर्गाताई तांबे , सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेचे सेंक्रट्ररी दत्तात्रय चासकर , रजिस्टर बी आर गवांदे , कारखान्याचे संचालक गणपतराव सांगळे , दूध संघाचे व्हाचेअरमन राजेंद्र चकोर , दूध संघाचे संचालक  विक्रम थोरात , इंटरनॅशनल स्कूल अध्यक्ष डॉ संजय सांगळे , शेतकी संघाचे संचालक संतोष नागरे , विनायकराव थोरात , अॅड अशोकराव हजारे , भिमाजी राहिंज , बाळासाहेब मुन्तोडे , बापूसाहेब पाबळ , रावसाहेब नागरे , गिताराम गायकवाड , नानासाहेब शिंदे , सोमनाथ सातपूते , संजय खरात ,  भिकाजी गीते प्राचार्य सचिन जाधव आदीसह विदयार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

                                                                                                             आ.बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की , स्कूल उभारण्याकरिता खूप अडचणी आल्या मात्र स्व शिवाजीराव थोरात , स्व रघुनाथ मुन्तोडे दिलावर शेख यांच्यासह कार्यकर्त्याचे मोठे योगदान मिळाले कमी कालावधीतचं स्कूलची प्रगती झाली आज या स्कूलमध्ये २९५ विद्यार्थी शिक्षण घेत असून ग्रामिण भागाच्या मानाने डॉ संजय सांगळे , प्राचार्य सचिन जाधव यांनी खूप मेहनत केली त्यामुळेचं स्कूलची प्रगती होवू लागली स्कूल उंच टेकड्यावर असल्याने वातावरण शुद्ध व सुंदरमय निर्माण झाले त्यामुळेचं मुलांच्या कलागुणांना वाव मिळाला . निसर्ग रमणिय वातावरणामुळे भविष्यात येथेचं विदयार्थ्याच्या सहली येतील तर अशा वातावरणात अभ्यासाबरोबर विदयार्थ्याच्या कलागुणांना वाव मिळाल्यास भविष्यात हा विदयार्थी सुजान नागरिक बनेल .

                                                                             या परिसरातील लोकांच्या ऋणानुबंध व प्रेमामुळे ५ वेळेस विधानसभेचे प्रतिनिधीत्व केले.आजही तेचं संबंध आहे परिसरातील गोर गरिब मुलांना कमी खर्चात उच्च शिक्षण मिळावे याचं हेतुने या संस्थेची उभारणी केली असून भविष्यात विविध प्रकारचे कॉलेज उभे राहतील . तेव्हा कार्यकर्त्यानी आपली मतभेद बाजूला ठेवून एकदिलाने काम करा.असे आवाहन केले .

 मराठी , हिंदी , इग्रजी गाण्यावर लहान – लहान मुलांनी सादर केलेल्या अप्रतिम रंगीबेरगी पोशाखातून केलेल्या डान्समुळे आ . बाळासाहेब थोरात यांच्यासह मान्यवर , पालक अवाक् झाल्याचे दिसून आले .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed