संगमनेर झुंजार न्यूज
राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असणारे संगमनेर तालुक्यातील कोकणगाव येथील नवक्रांती मंडळातील ग्रामपंचायत सदस्य सौ संजना मच्छिंद्र पवार व मच्छिंद्र सखाराम पवार तसेच सौ वनिता घनश्याम भोसले व घनश्याम अण्णासाहेब भोसले यांनी जाहीररित्या शेतकरी विकास मंडळ कोकणगाव मध्ये प्रवेश केलेला आहे.
कोकणगाव ग्रामपंचायतचा कार्यकालला दोन वर्ष झालेले आहे. लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व उपसरपंच अरुण जोंधळे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून मागील दोन वर्षा पासून गावातील विकास व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी शेतकरी विकास मंडळ यामध्ये प्रवेश केलेला आहे. यावेळी शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ पा. जोंधळे तसेच तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी जोंधळे ,दीपक जोंधळे, उपसरपंच अरुण जोंधळे,रावसाहेब भोसले ,बाळासाहेब जोंधळे, राजेंद्र पारधी ,दिलीप जोंधळे, अंबादास जोंधळे ,शिवसेना अध्यक्ष पोपटराव भोसले, योगेश भोसले, सुरेश वाकचौरे ,विजय वामन, नंदू ढगे ,गोरख जोंधळे, भाऊसाहेब पवार ,साहेबराव गवळी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना सौ संजना पवार म्हणाल्या की,
कोकणगावचे उपसरपंच अरुण भाऊ जोंधळे यांच्या कामाची पद्धत व वारंवार येत असलेल्या निधी यामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सर्व गावासह आम्ही सोबत असल्याने शेतकरी विकास मंडळाचा पाया मजबूत झालेला आहे .

अरुण जोंधळे म्हणाले की आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुक्याची वाटचाल वैभवाकडे सुरू आहे कोकणगाव साठी सातत्याने त्यांनी मोठा निधी दिला असून या विकास प्रक्रियेत या भगिनी सहभागी झाल्याने गावच्या विकासात नक्कीच भर पडेल असेही ते म्हणाले

