संगमनेर : झुंजार न्यूज 

        काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील प्रत्येक गावच्या विविध विकास कामांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला असून सन 2022- 23 या आर्थिक वर्षात आमदार थोरात यांनी सुचवलेल्या व पाठपुरावा केलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत रस्ता डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी 2515 अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे.

विविध गावांमधील रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरण कामाकरता 2515 योजनेअंतर्गत आलेल्या निधीबाबत माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुका हा राज्यातील मोठा  तालुका असून पठारभाग, प्रवरा पट्टा व तळेगाव भाग असा भौगोलिक दृष्ट्या विस्तार आहे. या अंतर्गत असलेल्या सर्व गावे व वाडी वस्तीसाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने विकासाच्या विविध योजना राबविल्या आहेत.विकास कामातून संगमनेर तालुका हा राज्यातील वैभवशाली व प्रगतशील तालुका म्हणून ओळखला जात आहे.

सन 2022- 23 या आर्थिक वर्षात स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी सुचवलेल्या व पाठपुराव्यातून विविध गावांमध्ये रस्ते डांबरीकरण मजबुती करण्यासाठी 2515 मधून 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या अंतर्गत तळेगाव दिघे बोडकेवाडी ते भागवत वाडी रस्ता मजबुतीकरण डांबरी करण्यासाठी 20 लाख रुपये, देवकौठे ते घोडमाळ शिवाचा रस्ता डांबरीकरण व मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, भागवतवाडी ते वामनवाडी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण 20 लाख रुपये, सावरगाव तळ येथील गावअंतर्गत सावरगाव ते चंदनापुरी शिव रस्ता 15 लाख रुपये, नांदुरी दुमाला येतील नांदुरी पेमगिरी रोड मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, झोळे येथील झोळे ते सावरगाव तर रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, चंदनापुरी येथील आपटे मळा रस्ता खडीकरण व डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, साकुर अंतर्गत हिरेवाडी रस्ता खडीकरन व डांबरीकरणासाठी 20 लाख रुपये, साकुर येथील चिंचेवाडी ते भगत वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, मांडवे येथील मांडवे फाटा ते खेमनर वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, डोळासणे येथील बांबळेवाडी ते रामेश्वर वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, कवठे मलकापूर येथील सुळकेवाडी रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये

तर जांबुत मधील जांबुत खुर्द वाडा वस्ती रस्ता कामासाठी 15 लाख रुपये, धांदरफळ बुद्रुक येथील काळे वस्ती रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये, पिंपरने येथील राहींज वस्ती ते जि प शाळा मजबुतीकरण कामासाठी 15 लाख रुपये, निमज येथील येवले वस्ती रस्ता कामासाठी 20 लाख रुपये, कोकणगाव येथील पानसरेवाडी शिव रस्ता मजबुतीकरण डांबरीकरणासाठी 15 लाख रुपये, माळेगाव हवेली 20 लाख रुपये, कवठे धांदरफळ 20 लाख रुपये, कवठे मलकापूर 20 लाख रुपये ,दरेवाडी रस्ता मजबुतीकरण 20 लाख रुपये, सावरगावतळ- सरळडोम रस्ता 15 लाख रुपये ,चिंचपूर तांबे वस्ती रस्ता 15 लाख रुपये, नांदुरी दुमाला येथील मुंजाबा वस्ती रस्ता कामासाठी 20 लाख रुपये ,निमगाव बुद्रुक येथील कानवडे वस्ती ती घोडी डोंगर रस्ता 15 लाख रुपये, झोळे येथील लेंडी ओढा ते सावरगाव तळ रस्ता मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये आणि सावरगाव तळ येथील सावरगाव ते मांडवदरा रस्ते मजबुती करण्यासाठी 20 लाख रुपये असे एकूण 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे .

 1

या निधीमुळे या विविध गावांमधील रस्त्याचे खडीकरण, मजबुतीकरण  व डांबरीकरण होणार असून दळणवळणाच्या साठी ग्रामीण भागातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या विविध गावांमधील नागरिकांनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे..

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed