संगमनेर : झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्वेकडील साकूर ते घारगाव हा पठार भाग दुष्काळी पट्टा असल्याने येथिल शेतकरी, कष्टकरी, मंजुर हा नेहमी निसर्गाची अवहेलना सोसत आला आहे. येथिल शेती पावसाच्या पाण्यावर अवलबून असल्याने पावसाळ्याचे चार महिने सोडल्यास इतर आठ महिने येथे पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, शरीराची होरपळ करणाऱ्या उष्णतेचा सामना येथिल शेतकऱ्याना करावा लागत असतो. अशा या उजाड खडकाळ माळरानावर कोणी साखर कारखाना सुरु करेल यांची स्वप्नातही कोणी कल्पना केली नसेल. परंतू या उजाड खडकाळ माळरानावर नदंनवन फूलवण्याचे स्वप्न शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले तसेच पुणे येथिल ध्येय वेडे उद्योजक रवीद्रं बिरोले यांनी पाहिले व ते स्वप्न श्री गजानन महाराज साखर कारखाना (युटेक) उभारत पाच गळीत हंगाम यशस्वी रित्या पार पाडत पूर्णत्वास नेले आहे.
गजानन महाराज साखर कारखाना ऊभारणी झालेल्या कौठे-मलकापूर या खडकाळ माळरान पट्टयात ऊस क्षेत्र, बागायती जमिन व कोणत्याही अत्याधुनिक सुविधा नसताना साडेतीन हजार टनी साखर कारखाना येथे सुरु झाल्याने येथिल लोकासाठी ही एक आश्चर्यजनक घटना आहे. सुमारे अडीशे कोटी रुपये खर्च करुन अतिशय अत्याधुनिक यत्रं-सामुग्री वापरत कारखाना, वीजनिर्मीती प्रकल्प व अासवानी प्रकल्प उभारणीचे काम करण्यात आले आहे. या कारखाण्यामुळे कौठे-मलकापूर परिसर, संगमनेर, पारनेर, शिरुर, अकोले या तालुक्यातील कुशल व अकुशल सुशिक्षित बेरोजगार तरुणाना यामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे रोजगार उपलब्ध झाला आहे.
उद्योजक रवीद्रं बिरोले हे तरुण कर्तुत्ववान व्यक्तीमत्वं असून वर्धा जिल्ह्यातील छोट्याशा शेतकरी कुटुंबात त्याचा जन्म झाला. त्यामुळे शेतकऱ्याची गरीबी व अडी – अडचणी यांची चागली माहिती व जाणीव त्याना आहे. रवीद्रं बिरोल यानी बी. ई. मॅकेनिकली पदवी घेतल्यानतंर ते पुण्यात आले. तांत्रिक ज्ञान, प्रचंड जिद्द, कष्ट करण्याची तयारी यातुन वाढत गेलेले व्यवसायिक संपर्क या शिदोरिवर १९८९ साली युटेक इंजिनिअरिंग प्रा. लि. या उद्योगाची त्यानी स्थापना केली. यातून साखर कारखाने, दूध संघ, डिस्लरी, इंडस्ट्रीयल पेट्रोकेमिकल कारखाने या उद्योगाना लागणाऱ्या मशिनरी बनवण्याचे काम त्यानी सुरु केले. यातून किमान दोनशे बेरोजगार तरुणाना रोजगार उपलब्ध करुन देत त्यानी ग्राहकांचा विश्वास संपादन करत आपल्या उद्योगाच्या कक्षा विस्तारण्याची घोड दौड सुरु केली व १९९६ साली कृषी क्षेत्राशी निगडीत रमा फुडसं अॅण्ड अॅग्रीकल्चर प्रा. लि. या शेतकरी हिताच्या कंपनीची स्थापना केली.
कृषी अधारित उद्योगाना सेवा देत असताना २०१२ ला संगमनेर तालुक्यातील कौठे – मलकापूर सारख्या निर्जन डोंगराळ उजाड अशा माळरानावर येथिल शेतकरी व जनतेच्या प्रगती व विकासाचा हेतू डोळ्यासमोर ठेवत कष्ट, दूरदृष्टीने अतिशय धाडसी निर्णय घेत येथिल शेतकऱ्याच्या मदतीने ३ लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट घेऊन युटेक शुगर लि. या कंपनीची स्थापना येथे करत साखर कारखाना उभारणीचा प्रकल्प त्यानी हाती घेतला होता.
दरवर्षी प्रमाणे ३ मे हा रवीद्रं बिरोले साहेबाचा वाढदिवस दिन असतो. सर्वत्र शेतीमालाच्या हमी भावाची झालेली दुरावस्था व त्यातून झालेल्या हजारो कर्जबाजारी शेतकऱ्याच्या आत्महात्या हि ह्रदय हेलावणारी परिस्थिती समोर आसल्यामुळे व येथिल दुष्काळी परिस्थिती डोळ्यासमोर ठेवत रवीद्रं बिरोले यानी इतर सर्व खर्चिंक अनावश्यक कार्यक्रमाना फाटा देत ते समाजउपयोगी उपक्रम हाती घेत आले आहेत. कारखाना परिसरात वृषारोपण करुन या परिसरात नदंनवन फुलवण्याचे काम त्यानी सुरु केले आहे. तर या परिसरातील ऐतिहासिक वारसा असलेल्या अहिल्यादेवी होळकर यांनी खोदलेल्या विहिरी व बारवाचे पु्नर्जिवीकरण करुन यात स्वंच्छ व निर्मळ पाणी साठवण्याचेही त्यानी ठरवले आहे. आज स्पर्धेच्या युगात प्रसिध्दिसाठी हाप – हापलेल्या व बडेजाव मिरवणाऱ्या पुढारी व उद्योगपतीच्या डोळ्यापूढे एक सामाजिक दायित्वाचा नवा आदर्श या निमित्तांने रवीद्रं बिरोले यांनी ऊभा केला आहे.
उद्योजक रवीद्रं बिरोले हे विज्ञानवादी असले तरी शेगावच्या गजानन महाराजानवर त्याची निस्सीम श्रध्दां आहे. या श्रध्देतून त्यानी युटेक साखर कारखान्याचे नामकरण श्री गजानन महाराज साखर कारखाना असे केले असून याचं कारखाण्याच्या प्रारगंणात सुरवातीला गजानन महाराजाचे भव्य असे मंदिर उभारत अध्यात्मिक विचाराचा व सामाजिक कार्याचा निस्वार्थ डोलारा या परिसरात त्यानी ऊभा केला आहे. परिसरातील उजाड माळरानावर शेतकऱ्याच्या शेती मालाला योग्य बाजारपेठ, येथिल जनतेच्या रोजगाराचा प्रश्न, उद्योगाच्या विस्ताराचा व येथिल सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी नियोजनपूर्ण काम करणारे रवीद्रं बिरोले हे ध्येय वेडेचं म्हणावे लागतील. कारण कौठे- मलकापूर सारख्या खडकाळ माळराणावर औद्योगिक क्रांती करत शेतकऱ्याच्या प्रगतीचे नदंनवन फुलवण्याचा स्वंप्नवत प्रयत्न करत असलेले उद्योजक रवीद्रं बिरोले याना असमानी व मानवनिर्मित अडचणीचा सामना करावा लागला असली तरी त्यानी न डगमगता त्याचा समर्थपणे सामना केला. त्यामुळे त्याना सामाजिक, अर्थिक, औद्योंगिक व अध्यात्मिक परिवर्तन निर्मीतीचे शिल्पकारचं म्हणावे लागेल व यातुनचं त्याची समाजापर्ती असलेली सेवावृत्ती अधोरेखित होत आहे.
आज रवीद्रं बिरोले यांच्या ५२ व्या वाढदिवसानिमित्तं त्याच्या सर्व मित्रंपरिवाराकडून, उद्योग व्यवसायातील सर्व सहकारी, अधिकारी व कर्मचाऱ्याकडून, संगमनेर तालुका व कौठे-मलकापूर पंचक्रोशितील तमाम जनतेकडून रवीद्रं बिरोले साहेबाना वाढदिवसांच्या खुप-खुप शुंभेच्छां..!
संकलन व शब्दाकन :- पत्रकार राजेश गायकवाड
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *