संगमनेर : झुंजार न्यूज 

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ” प्रबोधनाचे नवे युग निर्माण करण्यासाठी ” बुधवार दि ३ मे रोजी सायंकाळी सहा वाजता मुख्य चौकात लोकशाहीर संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहीती अनिल मुन्तोडे यांनी दिली . 

 
  यावेळी अनिल  मुन्तोडे यांनी सांगितले की , डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने गेल्या अनेक दिवसापासून आंबेडकर गौरव रंथाच्या माध्यमातून गांवोगांवी जावून आजच्या पिढीला  प्रबोधन गरज असून होवून गेले युग पुरुष हे कसे घडले यांचे ज्ञान हवे आहे त्याकरिता परिसरातील लोकांना आंबेडकर जयंतीनिमित्ताने प्रबोधन व्हावे याच हेतूने आश्वी खुर्द येथे संभाजी भगत यांच्या शाहिरी जलसा कार्यक्रमाचे आयोजन केले त्यांची तयारी ही अंतिम टप्प्यात आली असून परीसरातील शेकडो स्वयंसेवक कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे.यासाठी रविवारी स्वयंसेवकांची कार्यशाळा आयोजित करण्यात होती . आश्वी परिसरातील १०० पूर्वनोंदणीकृत कार्यकर्ते यात सहभागी होत आहे.परिसरातील नागरिकांची पार्किंगची व्यवस्था आश्वी खुर्द बाजारतळ याठिकाणी केली असून नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन संयुक्त जयंती महोत्सव समितीने केले आहे.

समितीने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की,आज देशात प्रचंड महागाई, बेरोजगारी, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या समस्या अत्यंत गंभीर होत असून सर्वच वर्गसमुहतील लोकांच्या समस्या उग्र रूप धारण करत आहेत. अशा परिस्थितीत मिळालेल्या संविधानिक हक्क अधिकारांची पायमल्ली होत असताना समाज प्रबोधन करणे व आपल्या हक्क अधिकारांचे जतन करण्यासाठी लढा देणे ही बुध्दीजीवी वर्गातील लोकांची सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे.
त्यानुषंगाने संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी परिसरात मोठ्या प्रमाणात बैठका आयोजित करून यशस्वी करण्यात आलेल्या आहेत.


समाज प्रबोधनाचा सुयोग्य परिणाम साधला जावा यासाठी संयुक्त जयंती महोत्सव समितीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या “माझ्या दहा सभा जो परिणाम करू शकत नाही; तो परिणाम शाहिरांचं एक गीत करू शकते” !या विचाराला आधार बनवून सर्व स्तरातील समाज बांधवांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रसिध्द लोकशाहीर संभाजी भगत यांच्या विद्रोही शाहिरी जलसा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

तरी आश्वी परिसरातील तमाम नागरिकांना या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी सन्मानपुर्वक निमंत्रित करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने शाहिरी जलसा कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *