देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा – काँग्रेस नेते आमदार थोरात

महाराष्ट्र दिनानिमित्त संगमनेर येथे ध्वजवंदन कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा

संगमनेर : झुंजार न्यूज

विविध परंपरा लाभलेले महाराष्ट्र राज्य विकासात देशात अग्रगण्य राज्य म्हणून लौकिक निर्माण झाला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले असून मोठ्या संघर्षातून मुंबई सह महाराष्ट्र राज्य निर्माण झाले असून देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा असल्याचे गौरवउद्गार काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात शासकीय ध्वजारोहण काँग्रेसने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे ,प्रभारी तहसीलदार गणेश तळेकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, पोलीस निरीक्षक भगवान माथुरे यांसह सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्ष आपण साजरी करत आहोत .याचबरोबर महाराष्ट्राच्या निर्मितीची 63 वर्ष आपण साजरी करत आहोत. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण व देशाचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुढाकारातून 1 मे 60 रोजी  मुंबई सह महाराष्ट्र राज्य झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अनेकांनी हुतात्मे पत्करले आहे. 63 वर्षाच्या वैभवशाली वाटचालीतून  महाराष्ट्र हे देशातील सर्वात अग्रगण्य राज्य म्हणून ओळखले जात आहे.

 f

महाराष्ट्र दिनाबरोबर आज कामगार दिन ही मोठ्या उत्साहाने साजरा होत असुन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये कामगार बंधूंचाही मोठा वाटा राहिला आहे. कृषी, सहकार ,औद्योगीकरण, शिक्षण, सांस्कृतिक व वैभवशाली वातावरण हे हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य असून यापुढेही राज्याचे नाव उज्वल करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *