धांदरफळ बुद्रुक मध्ये घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यांसह विविध रस्ते कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी समवेत इद्रजित थोरात, बाळासाहेब देशमाने, अनिल काळे, अनिल देशमुख, सरपंच सौ.उज्वला देशमाने, जयदेव ढेरे, अशोक वलवे, संतुजी नाईकवाडी, शिवाजी काळे, सुनील देशमुख, भानुदास शेटे, नवनाथ देशमाने, शरद कवडे, कैलास ढेरे, मारुती कोल्हे, सुरेखा तोरकडी, दिपाली वाकचौरे, दत्ता कासार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प इंदिरानगर रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटार संत रोहिदास सभागृह गावठाण अंगणवाडी प्रवारा नदी कंपाऊंड स्वच्छ भारत मिशन अंतर्गत रामेश्वर देवस्थान ठिकाणी विविध विकास कामे आघाडी वस्ती ते कारेश्वर मंदिर रस्ता काठवण मळा रस्ता यांसह 85 लाख रुपयांच्या निधीतील विविध विकास कामांचा शुभारंभ झाला.
यावेळी बोलताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने तालुक्याच्या वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. मागील वर्षी सुमारे 700 कोटींमधून पेयजल योजना राबवून अनेक गावांचा पाणी प्रश्न पुढील अनेक वर्षांसाठी सोडवला आहे. सततचे विकास कामे व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची पद्धत यामुळे संगमनेर तालुका हा ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरले असून हीच परंपरा कायम जपतांनी सर्वांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन त्यांनी केले.
तर कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, प्रत्येक गावात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत असून भौतिक सुविधांचा लाभ मिळावा. याबरोबर परिसर स्वच्छ राहावा. या करिता प्रत्येक नागरिकाने काम केले पाहिजे. घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन ही प्रत्येक गावात करणे गरजेचे असून नागरिकांनी व महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
तर बाळासाहेब देशमाने म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली धांदरफळ मध्ये अनेक विकासाच्या योजना राबवली असून आदर्श गाव करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच सौ उज्वलाताई देशमाने यांनी केले तर दत्ता कासार यांनी सूत्रसंचालन केले व अनिल काळे यांनी आभार मानले.
