संगमनेर : झुंजार न्यूज
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना येत्या दि. २८ मे २०२३ रोजी शिर्डी येथे होणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या राज्य अधिवेशनास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून निमत्रंण दिले या अधिवेशनास येण्याचे फडणवीस यांनीही निमत्रंण स्विकारले असल्याचे सुत्राकडून माहिती मिळाली .
या पुर्वी ३ आक्टोबर २०१७ला रिपब्लिकन हिरक महोत्सवी निमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशन शिर्डी मध्ये झाले होते . त्यावेळी तत्कालिन महसूल मंत्री चद्रकांत पाटील , प्रा . राम शिंदे , महादेव जाणकर , सदाभाऊ खोते , हे मंत्री उपस्थित होते . यावेळी अहमदनगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यानी मोठी मेहनत करुन अधिवेशन यशस्वी केले होते .
२७ मे २०२३ ला पुन्हा रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशन होत असल्याने याकडे लोकांचा कल वेगळा दिसत आहे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे शिर्डी , अहमदनगर जिल्ह्याशी विशेष ऋणानुबंध असल्याने सर्व नेत्याशी मैत्री पुर्ण संबंध आहे २०१४ ला रामदास आठवले हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून कॉग्रेस च्या पाठीब्यावर उभे होते , मात्र तेव्हा मोदी लाट सुरु झाल्याने लोकांचा युतीकडे कल गेला मतदारांनीही वरिष्ठ नेत्याचे ऐेकले नाही . त्यामुळे रामदास आठवले यांना पराभव स्विकारावा लागला . मात्र २०१४ नंतर राजकारणात मोठी उलथा पालथी झाली . चारही दिशेला मोंदीचे वारे वाहू लागले .मुरबी राजकारणी लोकांनी ही आपल्या राजकारणाची गाड्या वाहत्या गंगेत घातल्या व आपले राजकारण सोयीस्कर करुन घेतले . समाज्याचे भवितव्य समोर ठेवत रिडोल्सचा प्रयोग करत कॉग्रेस – राष्ट्रवादीशी फारकत घेत रामदास आठवले यांनी आपली राजकारणाची दिशा बदलली . नरेंद्र मोदीशी सलगी केल्याने एकमेव महाराष्ट्रीन दलित नेता म्हणून रामदास आठवले यांना केंद्रात राज्यमंत्री मिळाले . त्यानंतर मागे वळून न बघता रामदास आठवले यांनी ही मंत्री पदाच्या माध्यमातून समाज्याची कामे मार्गी लावताना दिसत आहे .
