कर्नाटक मधून भाजपची घसरण सुरू

संगमनेर मध्ये कर्नाटक विजयाचा जल्लोष

संगमनेर : झुंजार न्यूज 

कर्नाटक मधील विजय हा मोठा असून तो जनतेचा विजय आहे. भाजपने सुरू केलेले दहशतीचे आणि जातीभेदाचे राजकारण हे भारतीय नागरिकांना मान्य नसून कर्नाटक विधानसभा निकालाने देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या रक्षणासाठी देशात व राज्यात काँग्रेसच्या सरकारची गरज असून भाजपाची आता घसरण सुरू झाली असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे .

कर्नाटक विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या विजयाचा आनंद संगमनेर मध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोषात  साजरा केला. यावेळी समवेत आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात ,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वासराव मुर्तडक,निखिल पापडेजा, सुभाष सांगळे, गौरव डोंगरे, जयराम ढेरंगे, किशोर टोकसे, अर्चनाताई बाकोडे आदींसह तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या विजयानंतर बोलताना काँग्रेस नेते आमदार थोरात म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांच्या विकासाचा व लोकशाहीवर  विश्वास असणारा पक्ष आहे. 2014 मध्ये भुलथापा देऊन सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने राजकारणासाठी स्वायत्त संस्थांचा वापर केला आहे. देशात महागाई, बेरोजगारी वाढलेले असताना धार्मिक मुद्दे पुढे केले जात आहे .भाजपाची कार्यपद्धती ही दहशतीची आणि द्वेषाची असून समाजा समाजात तेढ निर्माण करत आहे. यामुळे भारतातील नागरिक बंधू-भगिनी हे अस्वस्थ आहेत .

जनतेमधील ही अस्वस्थता दूर करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी 3560 किमी ची केलेली भारत जोडो यात्रा ही ऐतिहासिक आणि अभूतपूर्व ठरली आहे .या यात्रेतून हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक मध्ये काँग्रेसला मोठा विजय मिळाला आहे. श्रीमती सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या पाठीशी सर्वसामान्य जनता उभी राहिली आहे.

जनतेचा काँग्रेसवर मोठा विश्वास असून आगामी काळात देशात व राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर येणार आहे. लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी ,देशाचा विकास घडवण्यासाठी, स्वायत्त संस्थांना पुन्हा स्वायत्तता देण्यासाठी काँग्रेस पक्ष हा अत्यंत गरजेचा
आहे.

संगमनेर ( प्रतिनिधी ) काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून संगमनेर तालुक्यातील विकास कामांची घोडदौड सुरू असून आमदार थोरात यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तालुक्यातील रस्त्यांसाठी 21 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनी दिली आहे. रस्त्यांच्या निधीबाबत माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली होती. या कालव्यासाठी मोठा निधी मिळून रात्रंदिवस कामे सुरू ठेवले होते. मात्र नवीन सरकार आले आणि अनेक कामांना स्थगिती दिली. मात्र आमदार थोरात यांनी विविध गावांमधील सुचवलेले रस्ते व विकास कामांसाठी निधी आता मंजूर झाला आहे. मागील आठवड्यात पंतप्रधान ग्रामसडक योजनेअंतर्गत विविध रस्त्यांसाठी 32 कोटी 36 लाख रुपयांचा निधी मिळवला. तर आता नव्याने तालुक्यातील विविध रस्त्यांकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून 21 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या अंतर्गत रणखांबवाडी फाटा- रणखांबवाडी ते कुंभारवाडी वरवंडी या 15 किलोमीटर रस्त्यासाठी 11 कोटी 25 लाख रुपये निधी, राजापूर ते राष्ट्रीय महामार्ग 50 चिखली 5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी , पिंपरने ते कोळवाडे शिरापूर या 5 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी 75 लाख रुपयांचा निधी आणि तळेगाव दिघे ते तालुका हद सायाळे या 4 किलोमीटर रस्त्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विविध रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीमुळे तालुक्यातील रस्त्यांचे जाळे आणखीच मजबूत होणार आहे. या मिळालेल्या निधीतून रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याने तळेगाव दिघे, पिंपरने ,कोळवाडे, राजापूर ,चिखली ,रणखांबवाडी, कुंभारवाडी, वरवंडी या गावांमधील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून देशात मोठी परिवर्तनाची लाट निर्माण झाली असून देशात व महाराष्ट्रातही परिवर्तन नक्की होणार असल्याचे आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

 यावेळी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांचा गजर ,फटाक्याची आतिषबाजी, गुलालाची उधळण करून काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणा दिल्या

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *