कोपरगांव : झुंजार न्यूज
या महाराष्ट्राच्या राजकारणासह समाजकारणाला एक दिशा देवून सामाजिक दृष्टीकोनातून एक वेगळेपण निर्माण करणारे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथे होणार्या रिपब्लिकन पक्षाचे महाअधिवेशनाच्या माध्यमातून एक सामाजिक ताकद दाखविण्याचे दृष्टीकोन असल्यानेचं तालुक्या – तालुक्यातून कार्यकर्त्यानी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन रिपाई प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी केले
कोपरगाव येथील सव्ससंर येथे शिर्डी येथे होणार्या अधिवेशन आढावा बैठकीप्रसंगी वाकचौरे बोलत होते . बैठकीच्या अध्यक्षस्थानी दिपकराव गायकवाड हे होते तर जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव , जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात , जिल्हा विभाग प्रमुख भिमा बागुल , रिपाई तालुकाध्यक्ष अनिल नन्नवरे , सोमनाथ लोहकरे , रामदास पोकळे , फकिरा चंदनशिव , बाबासाहेब भारुड , वैशाली सोनवणे , राणी पाटोळे , सत्यजीव कोळगे , अर्जुन काबळे , सागर गायकवाड , सुनिल खरा त , राहुल भिवस्ते , दिलीप पगारे राहल भिवस्ते , शोभा खंडीझोड , निर्मला वाकचौरे आदीसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते
विजयराव वाकचौरे पुढे म्हणाले की ,२००९ ला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून रामदास आठवले यांचा पराभव झाला होता पण एक ऋणानुबंधातुन रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली त्याचं पार्श्वभुमीवर २०२४ च्या लोकसभा निवडणुकी डोळ्या समोर ठेवत होणार्या पक्षाच्या अधिवेशनातून रिपब्लिकन पक्षाची ताकद दाखवून त्या दृष्टिकोनातून नव्या – जुन्याचा मेळ घालत कार्यकर्त्यानी समाजाचा विचार करून मोठी ताकद निर्माण करा . या ठिकाणी मोठ्या संख्येने आदिवासी समाजाची मंडळी आहेत त्याचे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा निश्चितपणे आपण काम करू ! तसेच योजनाचा पाठपुरावा करुन घरकुल असेल गाई म्हशीची , विहिरीची प्रकरणे मार्गी लावू !
दिपक गायकवाड म्हणाले की , राज्याचे अधिवेशन असून दिन दलित , शेतकरी , आदिवाशी यांच प्रश्न मांडून ठरा व करायचा आहे . तालुक्यातुन मोठ्या संख्येने उपस्थित रहायचे आहे . पक्षाच्या माध्यमातून ४१ हजार जमिनी आदिवाशी समाज्याच्या नावावर केल्या . बाबा साहेबांची घटना महान असून
श्रीकांत भालेराव म्हणाले की , कोपरगांव फुले – आंबेडकर – साठे चळवळीचा वारसा आहे . जुन्या लोकांनी कार्यकर्त्यानी बांधला . चलो शिर्डी म्हणत हा परिसर निळामय करा रिपाई हे आपले कुटुंब आहे .
भिमा बागुल म्हणाले की , आपल्या रिपब्लिकन पक्ष महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर चालतो त्यांच्या संकल्पनेतून रिपब्लिकन पक्ष स्थापन झालेला आहे . त्याच पक्षाचे शिर्डी या ठिकाणी मोठ्य अधिवेशन होत आहे त्यांची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे . आपण प्रत्येक गावामध्ये , खेड्यामध्ये जाऊन या अधिवेशनाला बाबत माहिती दयाची आहे . या अधिवेशनासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्वच प्रमुख आमदार खासदार या ठिकाणी उपस्थित राहणार आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी आभार मानले ..
