संगमनेर : झुंजार न्यूज
भारतीय संस्कृतीत सण व उत्सवांना अनन्यसाधारण महत्व आहे.त्यातील महीलांचा वटपौर्णिमा उत्सव…सातजन्मी हाच पती मिळावा; या भावनेपोटी दरवर्षी महीला आनंदाने पुरोहीत यांच्या मंत्रोच्चाराच्या साक्षीने वडाच्या झाडास सुताच्या दोराने प्रदक्षिणा घालीत असतात..मात्र या वर्षी कोरोनाच्या सावटानंतर ऐन्य कडाक्याच्या ऊनात पौर्णिमा सापडल्याने महीलांचा हिरमोड झाला. मात्र अश्या कठीण परिस्थितीत देखील महीलांनी अंगणात लावलेल्या अथवा सार्वजनिक प्रांगणातील वडाच्या रोपट्याभोवती प्रदक्षिणा घालीत सण साजरा केला. वटपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी महीला वर्ग मोठ्या आनंदाने एकमेकांच्या सानिध्यात साजरा करित असतात.हिंदु संस्कृतीप्रमाणे वडाच्या झाडाची विधीवत पुजा -अर्चा करित आंबे, सौभाग्याचे लेणेसह सुपारी,कापसाच्या वातांची माळ,पांढरे व हिरवे वस्र असल्या वस्तु वडास अर्पण करतात.व जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी संकल्प करुन घरी येत केलेल्या भोजनास पाणी फिरत पतीचे चरणस्पर्श करुन आपला संकल्प पुर्ण करतात.मात्र कोरोना महामारीचा संसर्गासारखे अनेक संकटे येवून न डगमगता महीलांनी वडास प्रदक्षिणा घेतल्याचे दिसून आले त्यात कडाक्याच्या ऊनात वटपौर्णिमा सण साजरा व्हावा या दृढहेतुने महीलांनी सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या रोपट्यास विधीवत पुजा व सुताच्या धागाने प्रदक्षिणा करुन आपला सण मैत्रिणीच्या सोबतीने पुर्ण केला.


