{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

संगमनेरच्या अभिमानाचा क्षण; पद्मश्री सन्मानाने शहराचा मान उंचावला

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज 

 

 

संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील अभिमानाचा क्षण ठरलेल्या पद्मश्री पुरस्कार विजेते रघुवीर खेडकर यांचे संगमनेरमध्ये उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांचा सत्कार करताना भावनिक शब्दांत गौरव केला. कार्यक्रमास संगमनेर नगराध्यक्षा मैथिली तांबे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

“ज्या दिवशी दूरदर्शनवर पद्मश्री पुरस्काराची घोषणा झाली, त्या क्षणापासून संपूर्ण संगमनेरकरांसाठी तो अभिमानाचा दिवस ठरला. संगमनेरचा पहिला पद्मश्री म्हणून मिळालेला हा मान संपूर्ण शहरासाठी गौरवाची बाब आहे. आज प्रत्यक्ष पद्मश्री पदक संगमनेरमध्ये येताना पाहून अंगावर काटा उभा राहतो,” असे आमदार तांबे म्हणाले.

यावेळी त्यांनी पद्मश्री रघुवीर खेडकर यांच्या परिवारातील जपलेली माणुसकी आणि ऋणानुबंधांचा विशेष उल्लेख केला. कराड येथे दौऱ्यावर असताना माजी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याशी झालेल्या भेटीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, “रघुवीर खेडकर यांच्या आई ज्येष्ठ लोककलावंत कांताबाई यांनी अडचणीच्या काळात मदतीसाठी श्रीनिवास पाटील यांच्याकडे धाव घेतली होती. त्यावेळी त्यांनी केलेली मदत कांताबाईंनी आयुष्यभर स्मरणात ठेवली. ज्यांनी आयुष्यात साथ दिली, त्यांना कधीही न विसरणे, हे या परिवाराचे वैशिष्ट्य आहे.”

तसेच, “पहिला मान गावाचा आणि नंतर परिवाराचा,” अशी भावना व्यक्त करणाऱ्या परिवाराच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक करताना आमदार तांबे म्हणाले की, हा मोठेपणा त्यांच्या कलेत, स्वभावात आणि वागण्या-बोलण्यातूनही जाणवतो.

“देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेला पद्मश्री पुरस्कार हा केवळ रघु भाऊंचा सन्मान नाही, तर तमाशा क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक कलावंताचा गौरव आहे. या सन्मानामुळे येत्या काळात तमाशा आणि लोककला क्षेत्राला नवे चांगले दिवस येतील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *