लोणी / झुंजार न्यूज 

शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध असलेल्या भागात आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आश्रमशाळा आणि वसतिगृहाच्या एकत्रित प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची ग्वाही महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली .

एकात्मिक आदिवासी प्रकल्पा अंतर्गत हसनापूर येथे सुमारे १३ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.याप्रसंगी प्रकल्प अधिकारी राजन पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंता श्रीमती एस.बी.गाडेकर सरपंच सौ.छाया बारसे, एकलव्य आदिवाशी बहुजन पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष रेवननाथ जाधव , प्रवरा बँकेचे संचालक किसनराव विखे,चेअरमन अशोकराव धावणे आब्बास पटेल दादासाहेब घोगरे सरपंच सौ.पूनम बर्डे बाजार समितीचे संचालक राहूल धावणे उपसरपंच गणेश विखे अनिल विखे वकील संघाचे अध्यक्ष नितीन विखे आदी याप्रसंगी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले की,यापुर्वी समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनीच्या वसतिगृहाच्या इमारतीचा झालेले काम सर्वासाठी रोल माॅडेल ठरले आहे.या इमारतीचा मास्टर प्लॅन राज्यातील इतर वसतिगृहाच्या इमारतीसाठी उपयुक्त ठरला असल्याकडे लक्ष वेधून नव्याने विकसित होत असलेली इमारत सर्व सुविधांनी परीपूर्ण करण्याचा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्य सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांकरीता महत्वपूर्ण निर्णय करून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.संशोधनात्मक शिक्षणासाठी शिष्यवृती योजना सुरू केली.उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणी येत असल्याने वसतिगृहाच्या इमारती अद्यावत आणि सर्व सुविधांनी परीपूर्ण असाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी नमूद केले.

शैक्षणिक सुविधा उपलब्ध असलेल्या ठिकाणीच वसतिगृह उभारण्याचे सरकाचे धोरण आहे.काही भागातील आश्रमशाळांच्या समस्या गंभीर असल्याने अधिकार्यांनी अचानक भेटी देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,आश्रमशाळा आणि वसतिगृहाचे प्रकल्प एकत्रितपणे उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या जागेची उपलब्धता करून देण्याची तयारी आहे.

राजयातील आदिवासी विभागात सुविधा उपलब्ध होत असल्याने या भागातील नागरीक विकासाच्या मुख्य प्रवाहात येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असलेल्या निर्णयाची माहीती समाजातील युवकांनी जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

खा.सदाशिव लोखंडे यांनी लोणी येथे मंत्री विखे पाटील यांच्या पुढाकाराने समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या कामाचे कौतुक करून आशा इमारती आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांकरीता उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed