संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील खळी येथील कांगणे कुटुबांतचं एका भावांने दुसर्‍या भावांकडे विहीरीचा हिस्सा मागितला , ही विहिर माझ्या क्षेत्रात असल्याने हिस्सा मिळणार नाही म्हटल्याचा राग आल्याने झालेल्या मारहाणीत एकाचं कुटुबांतील चार जण जख्मी झाले तर १४ जणावर आश्वी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला .
मिळालेल्या माहितीनुसार खळी येथील गोरक्षनाथ किसन कांगणे हे गुरुवार दि २७ जुलै २०२३ रोजी दुपारी १ वाजल्याच्या सुमारास  गट नं ४४७ या आपल्या क्षेत्रातील असणार्‍या जनावरांच्या गोठयाजवळ काम करत असताना बाबासाहेब किसन कांगणे , दिलीप बाबासाहेब कांगणे , शोभा दिलीप कांगणे , शैला बाबासाहेब कांगणे , सुभाष मुरलीधर कांगणे , मैना सुभाष कांगणे , जालिंदर सुभाष कांगणे , पोपट कारभारी कांगणे , सागर पोपट कांगणे , रामदास रघुनाथ कांगणे , प्रकाश विठ्ठल कांगणे , तेजस ज्ञानदेव कांगणे , रमेश राजाराम घुगे , अलकाबाई रमेश घुगे ( रा. कांगणवाडी ‘ खळी ) हे सर्व जण समुहायाने आले व सुभाष मुरलीधर कांगणे व बाबासाहेब किसन कांगणे यांनी गट नं ४४७ क्षेत्रातील असणाऱ्या विहीरीत हिस्सा मागितला हे क्षेत्र फिर्यादीचे असल्याने या विहिरीत हिस्सा मिळणार नाही या राग आल्याने गोरक्षनाथ कांगणे यांच्यासह पत्नी ताराबाई , मुलगा विशाल व चैतन्य यांना शिवीगाळ व दमबाजी करत प्रकाश विठ्ठल कांगणे यांने गंजाने पायावर व सागर पोपट कांगणे डोक्यात काठीने गोरक्षनाथ कांगणे यांना मारहाण करत जख्मी केले . तर सुभाष मुरलीधर कांगणे यांनी गोरक्षनाथला जमिनीवर पाडून मारहाण केली . हे बघुन पत्नी व मुलांनी आरडा – ओरड केल्याने बाबासाहेब कांगणे यांनी ताराबाईच्या डोक्यात गंज मारला तर विशाल व चैतन्य यांना रामदास कांगणे यांने दगड मारुन व दिलीप कांगणे व सागर कांगणे यांनी लाथाबुक्यांनी मारुन जख्मी केले . जर आमच्या काही पोलिस केस केली तर एक – एकाचा बेत बघू असे दमबाजी करुन शिवीगाळ केली . गोरक्षनाथ कांगणे , पत्नी ताराबाई कांगणे , मुलगा विशाल व चैतन्य हे जख्मी झाल्याने त्यांना लोणी येथील प्रवरा ग्रामिण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे .
याबाबत प्रवरा रुग्णालयात जावून आश्वी पोलिसांनी गोरक्षनाथ कांगणे यांच्या दिलेल्या जबाबावरुन गु र नं व कलम १७८ / २०२३ नुसार ३२६ , ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४८ , १४९ , ५०४ , ५०६ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात येवून पो नि संतोष भंडारे यांच्या नेत्तृत्वाखाली पोलिस पुढील तपास करत आहे 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *