संगमनेर । झुंजार न्यूज

भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सदस्य व संगमनेर येथील स्व संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानचे अध्यक्ष रविंद्र संभाजीराव थोरात यांना तमिळनाडू सरकार व एशिया इंटरनॅशनल कल्चर अ‍ॅण्ड रिसर्च विद्यापीठ चेन्नई कडून ” डॉक्टरेट आणि लोकहिता सेवारत्न ” हा पुरस्कार देण्यात आला आहे. 
या दिमागदार सोहोळ्यात विद्यापीठ कुलगुरू डॉ. एम जिनू रामा शर्मा, सुप्रसिद्ध सिने अभिनेते शिवा राजकुमार, सुप्रसिद्ध सिने अभिनेते चियान विक्रम, सिने अभिनेते रंगराज सुबैय्या (सत्यराज) , कोईम्बतूर दक्षिण आमदार श्री.  वनथी श्रीनिवासन, टिंडीवनम आमदार श्री. अर्जुनन पी, तिरुनेलवेली आमदार श्री. नैमार नागेंद्रन, कोईम्बतूर खासदार श्री. पी. रामास्वामी नटराजन, विलुप्पुरम खासदार श्री. डी.रविकुमार व इतर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, उद्योजक आणि पत्रकार क्षेत्रातील अनेक मान्यवर  उपस्थिती होते . 
गेल्या अनेक वर्षांपासून रविभाऊ थोरात वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि संघटना यांच्याशी संलग्न असून त्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत आहेत. अहमदनगर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी स्व. संभाजीराजे थोरात प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे विशेष सामाजिक योगदान राहिलेले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन चेन्नई विद्यापीठानी घेतली व त्यांना ही उपाधी प्रदान केली.
डॉयरेक्ट व लोकहिता सेवारत्न हा पुरस्कार मिळाल्याने रविंद्र थोरात यांचे सर्व स्तरातून अभिमान होत आहे .
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *