संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पुर्व भागातील असणार्या पिंप्री लौकी अजमपुर या गावातील कु . स्वयंम भारत गिते यांनी श्रीरंग म्युझिक अँड फिल्म प्रस्तुत ” बंसी बजैया रे ” या सॉंग्स गीतातून श्रीकृष्णाची भूमिका साकारत एक ग्रामिण कलाकार चुणुक दाखविली . या गाण्याचे चित्रीकरण संगमनेर तालुक्यातील पेमगिरी आणि अकोले तालुक्यातील टहाकारी या ठिकाणी झाले आहे .

श्रीरंग म्युझिक अँड फिल्म प्रोडक्शन या टीमने अतिशय सुंदर गाण्याला जन्म दिला आहे कृष्णाष्टमीनिमित्त हे गाणं बनवण्यात आले आहे या गाण्याचे प्रमुख कलाकार स्वयम गीते आणि सेजल अहिरे यांनी या गाण्यात आपल्या अभिनयाने चार चाँद लावले आहेत. बालकलाकार शौर्य ढोके आणि नित्या बिरारी यांनी या गाण्यात बाल वयातील राधा कृष्णाची भूमिका केली आहे. गाणे बघत असताना खरोखर राधा कृष्ण अवतरले की काय असा भास आपल्याला होतो. लेखक, गायक, कंपोजर गोटीराम हीरेकर पिंपळगाव बसवंत गायिका पुनम ताई ढोके गाण्याचे डायरेक्टर प्रतिक विजयकुमार मिठे प्रोडक्शन हेड वैभव गांगोडे किरण शिरसाट आर्ट डिरेक्टर हर्षल हिरेकर मेकअप आर्टिस्ट रोहिणी काळे, लोकेशन मॅनेजर संकेत एखंडे, वैभव गीते कोरिओग्राफर ड्रेस डिझायनर पर्जन्या हिरेकर यांनी केले.

हे गीत दोन लोकेशनवर चित्रित झाले आहे पेमगिरी आणि टाहाकरी अशा निसर्गरम्य ठिकाणी जणू कृष्णाचे गोकुळच आहे की काय असा भास होतो. असे अप्रतिम लोकेशन या गीताला लाभले आणि दोन दिवसात या गाण्याचे चित्रीकरण झालं .

आज हे गाणं श्रीरंग म्युझिक अँड फिल्म या यूट्यूब चैनल वरती आलेले असून या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे मनमोहक दृश्य, राधाकृष्णांची अदाकारी आणि गाण्याच्या लिरिक्स लोकांना भावत आहे या गाण्याचे ऑडिओ रेकॉर्डिंग बीके स्टुडिओ मुंबई येथे झाले गाण्याचे संगीतकार विकास महाले यांच्या संगीताने हे गाणे अतिशय सुमधुर झाले आहे, दिग्दर्शक प्रतीक विजयकुमार यांच्या दिग्दर्शनाखाली हे गाणं अतिशय खुलून आले आहे

या गाण्या पाठीमागची मेहनत शब्दात वर्णली जाणार नाही या गाण्याला मिळालेला प्रतिसाद अतिशय सुंदर असून हे गाणे बनविण्यासाठी गाण्याचे निर्माता गोटीराम हीरेकर आणि टीम यांनी प्रयत्न केले .

