संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर येथील ग्रामस्थ व भजनी मंडळाच्या वतीने श्री संत भगवान बाबा यांच्या कृपाशिर्वादाने व ह भ प दत्तगिरी महाराज यांच्या शुभहस्ते अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते.
आठ दिवस चाललेल्या या सप्ताहात दैनंदिन कार्यक्रमात अखंड विना , काकडा , ज्ञानेश्वरी पारायण , गाथ्यावरील भजन तर ह भ प अरुण दराडे , ह भ प नागरे , ह भ प सचिन गायकवाड , ह भ प संकेत गांडोळे , ह भ प सुनिल पवार , ह भ प दत्तगिरी महाराज यांची प्रवचने , हरिपाठ , व ह भ प अरुण दराडे , ह भ प चांगदेव नेहे , ह भ प शांताराम जोरी , ह भ प सचिन गायकवाड , ह भ प सुनिल पवार , ह भ प प्रकाश आव्हाड , ह भ प अनंत काळे यांचे किर्तन झाल्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप दररोज करण्यात आले.
तर सप्ताहाच्या काल्याचे ह भ प दिगंबर महाराज किरकाडे यांचे किर्तन होवून आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . सप्ताहा यशस्वी करण्यासाठी आयोजकांसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले .
