संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी गावचे प्रसिद्ध सऩई वादक कलारत्न रामभाऊ कदम यांचा सनई वादय स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याने माजी गृहमंत्र्यांच्या हस्ते ‘ कलारत्न ‘ पुरस्काराच्या माध्यमातून मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
मातंग एकता संघटना यांच्यामार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तळवडे येथे सनई ताफा वाजंत्री संमेलन भरविण्यात आले होते . त्या संमेलनामध्ये 21 सनई वादय ताफ्याने सहभाग घेतला होता . यामध्ये पानोडी गावचे सनई वादक कलारत्न रामभाऊ कदम यांनी उत्कृष्ठ सनई वादन करून प्रेक्षकासह परिक्षकांची ही मने जिंकली
या स्पर्धेत पुणेसह विविध जिल्ह्यामधील स्पर्धकांमधून कदम यांनी एक नंबरचे पारितोषिक पटकावल्याने महाराष्ट्राचे गृहमंत्री रमेश दादा बागवे यांच्या हस्ते एक नंबरचे पारितोषिक देण्यात आले रामभाऊ कदम यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून कलात्मक सादर करत पानोडी गावचे नाव पुणे जिल्ह्यात झळकावले .
यावेळी रामभाऊ कदम यांना हा सन्मान मिळाल्याबद्दल सर्व क्षेत्रासह संगमनेर तालुक्यातुन त्यांचे अभिनंदन होत आहे .
Post Views: 811
