मुंबई । झुंजार न्यूज

 

तुम्हाला जे बोलायच आहे ते बोला 2024 च्या निवडणूकित आम्ही देऊ तुम्हाला ऐकदाच टोला अशी विरोधकांना टोला देणारी कविता सादर करुन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना.रामदास आठवले यांनी मुंबईतील दहीहंडी उत्सवात धमाल उडवून दिली.

 

चेबूर येथील पांजरा पोल येथे रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते.

 

यावेळी खासदार राहुल शेवाळे, रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,सुरेश बारसिंग,उपस्थीत होते.

किती ही आला पाऊस तरी मुंबईकरांना आहे दहीहंडाची हौस, नरेद्र मोदीनी फोडली विकासाची हंडी असे सागत आहे गावागावातील दादी मग सांगा कसे होतील प्रधानमंत्री राहुल गांधी कदम यांच्या नावात आहे राम मग का होणार नाही तुमचे काम अशा कविता सादर करित ना.रामदास आठवलेनी घाटकोपर मधील आमदार राम कदम यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात उत्साह आणला.

 

यावेळी ना.रामदास आठवले यांचे सुपुत्र कुमार जित आठवले उपस्थीत होते मुलुंड स्वप्न नगरी येथे रिपाइं चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अनिल भाई गांगुर्डे आणि रिपाइं च्या राष्ट्रीय उपाध्यक्ष सौ.शिलाताई अनिल गांगुर्डे यांनी आयोजित केलेल्या दहिहंडी उत्सवात सुप्रसिध्द नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा नृत्याचा कार्पाम आयोजित केला होता.

 

यावेळी नृत्यांगणा गौतमी पाटील यांचा केंद्रिय राज्य मंत्री ना.रामदास आठवले आणि त्याच्या पत्नी सौ.सिमाताई आठवले यांच्या हस्ते साडी आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी स्टेजवर गौतमी पाटील यांनी सादर केलेली नृत्यकला ना.रामदास आठवले यांनी सहकुटुंब आणि रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी पाहिला .

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *