संगमनेर । झुंजार न्यूज
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमीत्त मंगळवार दि.१९ सप्टेबर २०२३ ते २८ सप्टेबर २०२३ या काळात विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती थोरात कारखान्याचे कार्यकारी संचालक जग्गनाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली आहे.
आमदार बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनाखाली अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी थोरात कारखाना कार्यस्थळावर भव्य गणेशोत्सवाचे आयोजन होत असते. या निमीत्त राज्यभरातील दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन ही केले जाते. त्यामुळे कारखाना कार्यस्थळ हे गणेशोत्सव काळात गणेश भक्तांच्या गर्दीचे ठिकाण बनते. यावर्षी मंगळवार दि.१९ रोजी गणेश मिरवणूक व स्थापना,बुधवार दि.२० सप्टेबर रोजी रात्री ८ वा. महाराष्ट्रातील नं १ टाùप आणि हिट कार्यक्रम लावण्यांचा सुपर हिट कार्यक्रम अहो नादच खुळा, गुरुवार दि. २१ सप्टेबर रोजी दुपारी ३ वा रांगोळी व मेहंदी स्पर्धा,शुक्रवार दि.२२ सप्टेबर रोजी रात्री ८ वा. कौटुंबिक व विनोदी नाटक,शनिवार दि. २३ सप्टेबर रोजी सायं ४ वा.संगीत खुर्ची व चमचा लिंबू,रविवार दि.२४ सप्टेबर रोजी रात्री ८ वा. समर्थ प्राùडक्शन प्रस्तुत श्लोक निर्मित लावण्य जल्लोष,सोमवार दि. २५ सप्टेबर रोजी दुपारी ४ वा. सत्यनारायण महापुजा व हळदी कुंकु कार्यक्रम तसेच रात्री ९ वा.भजन, मंगळवार दि. २६ सप्टेबर रोजी सकाळी १० वा. शालेय क्रिडा स्पर्धा तसेच रात्री ८ वा. कवी अनंत राऊत यांची काव्यमय हास्य मैफल,गुरुवार दि.२८ सप्टेबर रोजी गणेश मिरवणूक व विसर्जन होणार आहे.
यावेळी आमदार बाळासाहेब थोरात,मा.आ.डॉ.सुधीर तांबे,कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, इंद्रजितभाऊ थोरात,संतोष हासे आदिंसह सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहे. तरी या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त नागरिक,युवक व महिला भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन संदिप दिघे,अशोक कवडे,भाऊसाहेब चासकर,गिताराम साबळे,सुभाष कुटे,विलास वैराळ,नवनाथ सोनवणे,राधु दिघे आणि अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
