संगमनेर । झुंजार न्यूज
दरवर्षीप्रमाणे गणेशाचे आगमन झाले आहे. अत्यंत मोठ्या उत्साहाने महाराष्ट्रात आणि आता देशातही गणरायाचे स्वागत होत आहे .हे वर्ष दुष्काळामुळे कठीण आहे. खरीप पिके पूर्णपणे वाया गेली आहे. शेतकरी अडचणीत आला आहे .अशा वेळेस राज्यावरील दुष्काळाचे विघ्न दूर होऊ दे अशी प्रार्थना मा. महसूल व कृषिमंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विघ्नहर्ता कडे केली आहे.
संगमनेर शिवाजीनगर येथील सुदर्शन निवासस्थानी आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या सुविधे पत्नी सौ कांचनताई थोरात यांच्या हस्ते श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पर्यावरण पूरक मूर्तीसह आकर्षक सजावटीने श्री गणेशाची स्थापना झाली.
यावेळी आमदार थोरात म्हणाले की, गणेश उत्सव महाराष्ट्रात मोठ्या आनंदाने साजरा होत असून आता देशात त्याची स्वागत होत आहे .यावर्षी सर्वत्र कमी पाऊस झाल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी अडचणीत आला आहे. अशा वेळेस गणरायाचे आगमन होत आहे .दुष्काळाच्या संकटाचे विघ्न गणरायाने दूर करावे उर्वरित काळात भरपूर पाऊस पडून शेतकरी ,नागरिक व जनता सुखी समाधानी व्हावी अशी प्रार्थना केली

तर राज्यात राजकीय परिस्थिती ही कठीण आहे. कधी नव्हती अशी अभूतपूर्व परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. देशात आपण नवीन संसदेत गेलो असलो तरी लोकशाहीची आणि राज्यघटनेची काळजी वाटते. गणरायाला ही प्रार्थना आहे की लोकशाही अबाधित राहावी तसेच भारतीय राज्यघटना अधिक ताकदवान व्हावी. या लोकशाही व राज्यघटनेतून देशातील सर्वसामान्य माणसाला न्याय मिळावा आणि सर्व मानवता सुखी व्हावी.
महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा आहे .महाराष्ट्रात महिलांसाठी 33% आरक्षण असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण आहे. महिलांनी अत्यंत चांगल्या प्रकारे संस्था सांभाळल्या आहेत. स्वर्गीय इंदिराची गांधी यांनी देश अत्यंत चांगला सांभाळताना आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा लौकिक वाढवला आहे. हे आपण पाहिले आहे. देशात महिलांची 50% संख्या असून अत्यंत कार्यक्षम व कर्तुत्वान महिला असल्याने देश सामर्थ्यवान करण्यामध्ये नक्कीच त्यांचा महत्त्वाचा वाटा असणार आहे. महिला आरक्षणाबाबत आमचा पाठिंबा असल्याचे ते म्हणाले यावेळी सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेत गणेश उत्सव आनंदाने व शांततेने साजरा करावा असे आवाहनही सर्वांना केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 10 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे
