संगमनेर । झुंजार न्यूज

 

राज्याचे महसूल ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि खा. डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे आयोजन करण्यात आलेले आहे.या महोत्सवा अंतर्गत आश्वी येथील विविध शाळा महाविद्यालयांच्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कला, विज्ञान, वाणिज्य व संगणकशास्त्र महाविद्यालय व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयातत सदर महोत्सवाचा सोमवारी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा सोहळा प्रमुख उपस्थितीत माजी जि.प.सदस्य अण्णासाहेब भोसले पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे , प स माजी सदस्य तबाजी मुन्तोडे , डॉ.दिनकरराव गायकवाड, रामभाऊ भुसाळ, निवृत्ती पा . सांगळे, योगेश तांबे , शंकरराव तांबे, सिताराम पवार, जेहुरभाई शेख, बस्ते ,उल्हासराव गागरे ,रावसाहेब वर्पे , मन्तोडे , माजी प्राचार्य वर्पे ,वाल्हेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी “प्रवरा सांस्कृतिक व क्रीडा महोत्सव २०२३” चे समन्वयक डॉ. राम पवार , महोत्सवाचे समन्वयक व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन व कनिष्ट महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.सयराम शेळके ,प्रा. देविदास दाभाडे , डॉ सुवर्णा जाधव, शेख सर, क्रीडा विभाग डॉ. प्रमोद विखे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ महाविद्यालय व माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने तसेच विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख डॉ. सोमनाथ भुमकर यांनी विशेष परिश्रम घेतले. सोमवारच्या कार्यक्रमात महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय दाढ बुद्रुक, प्रवरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वरवंडी, बालपण इंग्लिश मीडियम स्कूल पानोडी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आश्र्वी बुद्रुक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आश्वी खुर्द. विद्यालयातील एकूण ३८० विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *