संगमनेर । झुंजार न्यूज
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी आशा पाणी पुरवठा योजनेचे श्रेय घेणाऱ्यांनी त्यांचे आभार मानण्याचे मानण्याचे तरी मोठे मन दाखवण्याचा टोला संगमनेर विधासभा मतदार संघाचे प्रमुख सतिष कानवडे यांनी लगावला.
संगमनेर तालुक्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोळवाडे येथील पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केला यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना कानवडे म्हणाले की,केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेचे काम राज्यात आघाडी सरकारच्या काळात पूर्णपणे थांबले होते.निधी उपलब्ध असूनही योजनेची काम मार्गी लावण्यात अपयशी ठरलेले नेतेच आता गावोगावी पूर्ण झालेल्या योजनांचे श्रेय घेण्यासाठी धावपळ करीत असल्याचे पाहून आश्चर्य वाटत असल्याचे कानवडे म्हणाले.
वास्तविक तालुक्यातील अनेक गाव पाण्यापासून वंचित आहेत.सर्व सतास्थाने ताब्यात असताना पाणी प्रश्न सोडविता न आल्याने दरवर्षी तालुक्यातील काही गावे वाड्या वस्त्यांना टॅकरने पाणी पुरवठा करण्याची वेळ येते असल्याकडे लक्ष वेधत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशातील ग्रामीण भागा करीता जलजीवन मिशनचा कार्यक्रम सुरू करून प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहचविण्यचा ऐतिहासिक निर्णय घेतला.
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर या योजनांच्या कामांना गती मिळाल्याने योजांनाची काम पूर्ण होत आहे.आता या कामाचे श्रेय घेवून उद्घाटन करणाऱ्या नेत्यांनी किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानण्याचे तरी औदार्य दाखवावे असा टोला कानवडे यांनी लगावला आहे.
संगमनेर तालुक्यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून २६ आणि जल जीवन मिशन मिशन अंतर्गत ७२ योजनांची काम सुरू असून यासर्व योजनांकरीता ७४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या योजनांची काम चांगल्या पध्दतीने पूर्ण होण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील दर महीन्यला आढावा घेत आहेत.योजनेत कोणत्याही त्रृटी राहू नयेत म्हणून त्यांचा प्रयत्न असून, केंद्र आणि राज्य सरकारच्या सहकार्याने पूर्ण होत असलेल्या नळ पाणी पुवठा योजनांची काम पूर्ण होत असल्याने वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहीलेल्या गांवाना मोठा दिलासा मिळणार असल्याचे कानवडे म्हणाले.
