येवला । झुंजार न्यूज
आता २०२४ करिता लोकसभेच्या निवडणुकीचे चाहुल लागली असून भाजपने संधी दिल्यास शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढवणार असून लोकसभेच्या जागेची मागणी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) यांच्या बैठकीत करणार आहे याअगोदर मी पंढरपूर येथून दोन वेळा, मुंबई येथून एक वेळ खासदार राहिलो आहे. तर २०१४ ला शिर्डी येथे लोकसभा निवडणूक लढवली पण अपयश आले.” मात्र शिर्डी हे माझ्या जिव्हाळ्याचे असून निवडणुकीकरिता परिस्थिती अनुकुल असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदास आठवले म्हणाले
येवला येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते .
केंद्रीय मंत्री रामदास आठवले पुढे म्हणाले की , ज्या गावाला लागली होती बाबासाहेबांची पावले, त्या शहराचे नाव आहे येवले’, असे उद् गार काव्यच्या माध्यमातून काढत आठवले म्हणाले की, ”माझ्या सहित छगन भुजबळ व लाखो आंबेडकर अनुयायी मुक्ती भुमीकडे आज धावले.” आठवले यांनी कवितेतून येथील मुक्तिभूमीचे वर्णन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतराची घोषणा केलेल्या मुक्तीभूमी येथे अजून विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे २५० कोटी रुपयांचा प्रस्ताव देत मागणी करणार असल्याचे आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
ते म्हणाले, २०३५ मध्ये धर्मांतर घोषणेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने लाखोंचा जनसमुदाय इथे उसळणार असल्याने विकासासाठी २५० कोटी रुपयांची मागणी सरकारकडे करणार आहे.
Post Views: 708
