पहिल्या साखर पोत्याचे पूजन
संगमनेर
यावर्षी पाऊस कमी असल्याने उसाची टंचाई आहे मात्र सर्व ऊस उत्पादक सभासद यांचा कारखान्यावर मोठा विश्वास असून यावर्षी अडचणींवर मात करून दहा लाख टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याने कायम सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला असून दीपावली निमित्त कर्मचाऱ्यांना 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान असे 29.61% बोनस देण्यात येणार असल्याची घोषणा विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023 – 24 या गळीत हंगामाच्या पहिल्या पोत्याचे पूजन प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मा.आ. डॉ. सुधीर तांबे,सौ.दुर्गाताई तांबे,ॲड.माधवराव कानवडे,चेअरमन बाबासाहेब ओहोळ,रणजितसिंह देशमुख, वीरेंद्र थोरात, व्हा.चेअरमन संतोष हासे,नानासाहेब शिंदे,गणपतराव सांगळे,विक्रांत नवले, रामहरी कातोरे,विष्णूपंत राहाटळ,सुभाष सांगळे,कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वांवर कारखान्याची वाटचाल सुरू असून कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला आहे. यावर्षी कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांना 2835 रुपये तर कार्यक्षेत्राबाहेर ऊस उत्पादकांना 2715 भाव दिला आहे. हे वर्ष अडचणीचे आहे.मात्र तरीही अडचणीवर मात करून १० लाख मे.टन गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. यामध्ये सर्वांचे योगदान गरजेचे आहे. निळवंडेच्या पाण्याने अनेकांच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असून धरण कालव्यानंतर आता वीतरिका काम करणे हा तिसरा टप्पा आहे. लवकरात लवकर वितरिकांचे काम करून जास्तीत जास्त क्षेत्राला पाणी देणे याकरता काम होणे गरजेचे आहे. चांगला भाव देण्याबरोबर कारखान्याने कामगारांसाठी 20% बोनस व 30 दिवसांचे सानुग्रह अनुदान असे एकूण 29.61% बोनस दिला जाणार आहे. यामुळे सर्वांच्या जीवनात आनंद निर्माण होणार असल्याचे ते म्हणाले.

तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, अमृत उद्योग समूहातील कारखाना,दूध संघ व इतर सहकारी संस्थांमुळे सभासद,उत्पादक,कामगार या सर्वांना दिवाळीच्या काळामध्ये चांगली मदत मिळते. त्या माध्यमातून बाजारपेठ फुलली जाते. सर्वसामान्यांच्या जीवनात निर्माण करणारा हा अमृत उद्योग समूह व संगमनेरचा सहकार असून आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हे विकासाचे मॉडेल ठरले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रामदास वाघ,रमेश गुंजाळ,रोहिदास पवार,मिनानाथ वर्पे,चंद्रकांत कडलग,माणिक यादव,विनोद हासे,सभाजी वाकचौरे,आनंद वर्पे,विलास कवडे,अशोक हजारे,किरण कानवडे,शरद गुंजाळ, अशोक मुटकुळे,नवनाथ गडाख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे स्वागत कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. प्रास्ताविक बाबासाहेब ओहोळ यांनी केले.व्हाईस चेअरमन संतोष हासे यांनी आभार मानले.

