संगमनेर । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथिल हनुमान दूध संकलन केंद्राकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात १० लाख रुपये वाटण्यात आले .
शेतकऱ्यांची आर्थिक फायदा होण्याकरिता अमोल तांबे , संकेत तांबे यांनी हनुमान दूध संकलन केंद्र सुरु केले . कमी कालावधीतचं दूध उत्पादकाचा विश्वास संपादन केल्याने दूध उत्पादक आकर्षत होवू लागले पारदर्शक व्यवहार, योग्य वजन व वेळेत नियमित पगार यामुळे सभासद व दूध उत्पादकामध्ये विश्वासहर्ता निर्माण केला .
दिपावलीनिमित्ताने दूध उत्पादकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात १० लाख रुपये वर्ग केले .
दरम्यान नेहमी दूध उत्पादक व सभासदाच्या हितासाठी झटणाऱ्या संस्थेने दिवाळीनिमित्त दिलेल्या भेटीमुळे सभासद व दूध उत्पादकानमध्ये आनंदाचे वातावरण असून संस्था चालक अमोल तांबे , संकेत तांबे यांनी दिपावलीनिमित्त सर्वाना शुभेच्छां दिल्या आहेत.
Post Views: 715
