संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल आदर्श सहकारी दूध संस्थेकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३२ लाख ७० हजार रुपये वाटण्यात आल्याची माहिती चेअरमन शिवराम बोंद्रे व व्हा चेअरमन जगन्नाथ म्हस्के यांनी दिली .

शेतकऱ्यांची आर्थिक फायदा होण्याकरिता शिबलापूर येथे आदर्श सहकारी दूध संस्था सुरु करण्यात आली . कमी कालावधीतचं दूध उत्पादकाचा विश्वास संपादन करत पारदर्शक व्यवहार, योग्य वजन व नियमित पगार यामुळे सभासद व दूध उत्पादकामध्ये विश्वासहर्ता निर्माण केला .

 दिपावलीनिमित्ताने दूध उत्पादकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ४ रुपये ५० पैसे प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३२ लाख ७० हजार रुपये बँकेत वर्ग केले . तर दिपावली , पाडण्याच्या संस्थेकडून शुभेंच्छा देण्यात आल्या . 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *