संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील शेतकरी पार्वताबाई कारभारी तांबे यांचा सुमारे ९० गुंठे ऊस जळून खाक झाला आहे. यामुळे तांबे यांचे अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

 

याबाबत स्थानिक नागरिकांनकडून समजलेली माहिती अशी की, चिंचपूर खुर्द गावातील गट नंबर ४०मध्ये पार्वताबाई कारभारी तांबे यांचे ऊसाचे क्षेत्र आहे. शुक्रवारी अचानक पणे दुपारी ३ वाजेच्या सुमारास तांबे यांच्या ऊसाच्या शेतात शॉटसर्कीट झाल्या मुळे या ऊस क्षेत्राला आग लागली. आगीचे व धुराचे लोळ हवेत दिसू लागल्याने भारत तांबे,नकुल तांबे,रमेश थेटे,बाळासाहेब तांबे,सिताराम ताबे,आप्पासाहेब तांबे,कृष्णा तांबे रामा सावंत सागर तांबे रंगनाथ तांबे,चिमाजी गाडेकर, सागर पवार सह स्थानिकानी व पदमश्री डाॅक्टर विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचा आगनीशामक दलाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत ही आग विझवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे परिसरातील ऊस तसेच इतर शेती पिकाची मोठी वित्तहानी टळली आहे.

या घटनेची माहिती मिळताचं महावितरणचा कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. तसेच कामगार तलाठी यांना याबाबत माहिती देण्यात आली असून या घटनेचा ते उद्या पंचनामा करणार असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

दरम्यान शेतकरी तांबे यांचे मोठे अर्थिक नुकसान झाले असून त्यांना अर्थिक भरपाई मिळावी अशी मागणी स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *