संगमनेर । झुंजार न्यूज
आई-वडिलांच्या दिलेल्या संस्कारावरच मुले घडत असतात त्यावर पुढच्या पिढीचे भविष्य अवलंबून असते आई-वडिलांचे मुलांवर अनंत उपकार असतात आई-वडिलांच्या ऋणातून मुक्त पुण्य कोणत्याही मानवाला अशक्य आहे परंतु त्यांची सेवा त्यांचा सन्मान करणे मात्र प्रत्येकाला शक्य आहे असा सेवा सन्मान संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी येथील ग्रामपंचायत सरपंच नितीन सांगळे अमोल सांगळे निलेश सांगळे व अमेरिकेहून आलेल्या सोनाली केकान या चार भावंडांनी आई-वडिलांचा अभिष्टचिंतन सोहळा साजरा करून सेवा सन्मान करण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्येक तरुणाने या भावंडांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले
हंगेवाडी येथील श्री. सोमनाथ सहादु सांगळे सौ. मिराबाई सोमनाथ सांगळे श्री. तुकाराम सहादु सांगळे सौ. सुशिला तुकाराम सांगळे यांचा अभिष्टचिंतन सोहळा गुरुवार दिनांक 16 रोजी हंगेवाडी येथे मा. आ. बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा आ. डॉ. सुधीरजी तांबे हे होते
तर प्रमुख उपस्थितीत राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, दादासाहेब मुंढे, यमनाजी आघाव, गणपतराव सांगळे, राजेंद्र चकोर, भगवानराव इलग, संतोष नागरे, रामहरी कातोरे, बाळासाहेब देशमाने, नवनाथ महाराज आंधळे, लक्ष्मण खेमनर,शिवाजी जगताप, संजय फड, विक्रम थोरात, कचरू फड, हंगेवाडी गावच्या सरपंच सौ कमलताई कांगणे, उपसरपंच संतोष कांगणे, दीपक कांगणे, रमेश सांगळे, नारायणराव नागरे, मिनीनाथ वर्पे,,भाऊसाहेब फड, बंडू सांगळे आदीसह ग्रामस्थ नातलग मोठ्या संख्येने उपस्थित होते
यावेळी आदिनाथ महाराज लाड यांचे किर्तन झाले त्यांनी आई-वडिलांची सेवा करा आणि पुण्य मिळवा असे सांगितले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी ग्रामपंचायत सरपंच नितीन सांगळे अमोल सांगळे निलेश सांगळे व परिवाराने यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पर्बत यांनी केले
