पानोडी । झुंजार न्यूज 

 गेल्या काही दिवसांपासून चौंडी येथे धनगर आरक्षण मिळण्यासाठी काही तरूणांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. अनेक दिवसांपासून उपोषण सुरू असतांना देखील या उपोषणाकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष होत दिसून येत आहे या सुरु असणाऱ्या उपोषणास संगमनेर तालुक्यातील पानोडी मधील हजारवाडी येथील  धनगर समाजाच्या तरूणांसह ग्रामस्थांनी एक दिवशीय उपोषण करुन आपला पाठींबा दिला आहे .
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी चौंडीत यशवंत सेनेच्या वतीने उपोषणकर्ते आण्णासाहेब रुपनवर व सुरेश बंडगर हे उपोषणास बसले आहेत. या उपोषणाचा दहा – बारा दिवस झाले आहेत. उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. तरी सरकारच्या एकाही प्रतिनिधीने आद्याप दखल घेतली नाही. धनगर समाज राज्यात आक्रमक होतांना दिसत आहे. यावेळी राज्यात अनेक ठिकाणी उपोषण , आंदोलन करण्यात येत आहेत. 
यावेळी संरपच गणपत हजारे , डॉ बंडू हजारे , किसनराव हजारे , संपत हजारे आदीसह मोठ्या संख्येने धनगर समाज उपस्थित राहून आपला आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिला.
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed