संगमनेर । झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कृष्ण भूषण दूध संकलन केंद्राकडून दिपावलीनिमित्त दूध उत्पादकांना दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर ५ रुपये प्रमाणे उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३१ लाख २६ हजार ९४० रुपये वाटण्यात आल्याची माहिती संस्था चालक मोहीत गायकवाड यांनी दिली .

शेतकऱ्यांची आर्थिक फायदा होण्याकरिता आश्वी खुर्द  येथे १ डिसेबर २०२१ ला कृष्ण भूषण दूध संकलन केंद्र सुरु करण्यात आले . कमी कालावधीतचं दूध उत्पादकाचा विश्वास संपादन करत पारदर्शक व्यवहार, योग्य वजन व नियमित पगार यामुळे सभासद व दूध उत्पादकामध्ये विश्वासहर्ता निर्माण केला . आजमितीला १०१ दूध उत्पादक सभासद असून स्वच्छ व पारदर्शक व्यवहारामुळे दूध उत्पादक आकर्षित होत असून भविष्यात कृष्ण भूषण केंद्र ( संस्था ) ही नावारुपास असणार असल्याचा गायकवाड यांनी विश्वास व्यक्त केला .

 दिपावलीनिमित्ताने दूध उत्पादकाची दिवाळी गोड व्हावी यासाठी दूधाचे रिबेट व अनामत रक्कमेपोटी प्रतिलिटर प रुपये प्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात ३१ लाख २६ हजार ९४० रुपये बँकेत वर्ग केले . तर दिपावली , पाडण्याच्या केंद्राकडून शुभेंच्छा देण्यात आल्या . 
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *