संगमनेर । झुंजार न्यूज
मुंबई येथे इंटेरिअर व बांधकाम क्षेत्रात गेली १७ वर्षापासून कार्यरत संगमनेर तालुक्यातील शेडगांवचे भूमीपुत्र डॉ दिलीप शांताराम नागरे यांना २०२३ चा भारत बिजनेस अवार्ड मराठी सिनेमा क्षेत्रातील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते मीरा रोड येथील भारतरत्न लतादिदी मंगेशकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आला .
मल्हार इंटेरिअरर्सच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईमधील राजकिय नेते , व्यावसायिक , सिनेतारका , डॉक्टरर्स , वकील , आधिकारी यांच्यासह शासकिय – निमशासकिय कार्यालयासह सर्वसामान्यांच्या स्वप्नातील झोपू योजनेतून लहान – मोठ्या प्लॅट्सचे सुशोभीकरण करण्याचा हातखंडा गेल्या १७ वर्षापासून डॉ दिलीप नागरे यांचा आहे . कमी कालावधीत सुसज्ज असे सुशोभीकरण करण्यात आपला आगळा – वेगळा ठसा उमटविला . शेडगांव या ग्रामिण भागातील वयाच्या २० वर्षी मनाशी खुणगाठ व स्वप्न बघत मुंबईकडे प्रस्थान केले आपल्या गोड व मादक स्वभावातून मुंबई येथील लोकांची मने जिंकत कमी कालावधीतचं आपल्या इंटेरिअर व बांधकाम क्षेत्रात भरारी घेतली .
खेडया गांवातील दिलीप नागरे सारख्या युवकांनी मुंबई शहरात आपले पाय – मुळे रोवत व्यवसायातून भरारी घेतल्याने गावाकडील युवकांना ही उमेदाची दिशा दाखविली . आज ही गांवाकडील नाळ जोडून ठेवत शालेय विदयार्थ्याना विविध उपक्रमातून मदतीचा हात दाखवत आहे व्यावसायिक व सामाजिक विचारधारातून आपलातूनचं इंटेरिअर व बांधकाम क्षेत्राच्या माध्यमातून आज १०० लोकांचा उदरनिर्वाहा चालू असून या क्षेत्रात कमी कालावधीतचं नाव लौकिक मिळविल्याने अनेकदा पुरस्कार व स्मृती चिन्हे मिळविले नाशिक येथील रेसिल ग्रुपच्या वतीने २०२३चा भारत बिजनेस अवार्ड देवून डॉ दिलीप नागरे यांचा गौरव करण्यात आला .
Post Views: 653
